डी.के.शिवकुमार यांना विजय मिळवल्यानंतर अश्रु अनावर; म्हणाले,”मी हे कधीही विसरू शकत नाही की…”

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून निवडणुकांचे कल समोर येत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार काँग्रेस चांगलीच आघाडी घेत आहे. त्यातच कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार हे १ लाख मतांनी विजयी झाले आहेत. यावेळी बोलताना त्यांना विजयामुळे अश्रु अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.
कर्नाटक काँग्रेसच्या विजयानंतर डी के शिवकुमार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी, “काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी खूप मेहनत घेतली. जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला, नेत्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. हे सामूहिक नेतृत्वाचं फळ आहे. मी सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जून खरगे यांना विश्वास देतो की, आम्ही कर्नाटकच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू.
#WATCH | Party workers hail Karnataka Congress President DK Shivakumar as the party triumphs in the state, in Ramnagara pic.twitter.com/9QkE1Qxlev
— ANI (@ANI) May 13, 2023
मी हे कधीही विसरू शकत नाही की, या भाजपाच्या लोकांनी मला तुरुंगात टाकलं तेव्हा सोनिया गांधी मला भेटायला तुरुंगात आल्या. मी तुरुंगात राहणं पसंत केलं. हा गांधी कुटुंबाने, काँग्रेस पक्षाने आणि देशाने माझ्यावर टाकलेला विश्वास आहे. असे म्हणत त्यांनी कर्नाटकातील जनतेचे आभार मानले.





