डीके शिवकुमार यांनी विधानसभेत गायले RSS चे गाणे ; ऐकून सर्वांनाच बसला धक्का

DK Shivakumar। कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यामुळे विधानसभेत गोंधळ झालेला पाहायला मिळाला. शिवकुमार यांनी सभागृहात अचानक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) राष्ट्रगीत गाऊन वाद निर्माण केला. त्यानंतर भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी भाषणादरम्यान राष्ट्रीय सवयंसेवक संघाचे कौतुक केले होते. काँग्रेसने यावर पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. आता डीके शिवकुमार यांनी संघाचे गाणे गाऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
सोशल मीडियावर डीके शिवकुमार यांचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ते “नमस्ते सदा वत्सले मातृभूमे” हे RSS चे गाणे गाताना दिसत आहेत. त्यांचे हे वर्तन काँग्रेससाठीही धक्कादायक होते. काँग्रेस नेहमीच संघ आणि भाजपच्या विरोधात असताना, डीके शिवकुमार यांनी संघाचे गाणे गायले. एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, भाजपने आज काँग्रेसवर निशाणा साधत त्यांचे बहुतेक नेते आता आरएसएसचे कौतुक करतात.” असे म्हटले आहे.
Former RSS worker DK Shivakumar is Deputy Chief Minister of Karnataka Congress Government. pic.twitter.com/8SpZnbvAx5
— ಸನಾತನ (@sanatan_kannada) August 22, 2025
राहुल गांधींना कोणीही गांभीर्याने घेत नाही DK Shivakumar।
भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले, “नमस्ते सदा वत्सले मातृभूमी… काल कर्नाटक विधानसभेत डीके शिवकुमार हे आरएसएसचे गाणे गात असल्याचे दिसून आले. राहुल गांधी आणि गांधी-वाड्रा कुटुंबाचे जवळचे लोक आता धक्का बसले आहेत.” असे म्हटले आहे. पुढे बोलताना त्यांनी, “काँग्रेसमध्ये मतभेद वाढले आहेत. त्यांनी आरोप केला की पक्षातील कोणताही खासदार आता राहुल गांधींना गांभीर्याने घेत नाही.” असे म्हणत त्यांच्यावर टीका केली.
डीके शिवकुमार भाजपमध्ये सामील होणार आहेत का? DK Shivakumar।
डीके शिवकुमार यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर, ते भाजपमध्ये सामील होणार आहेत की नाही यावर चर्चा होताना दिसून येत आहे. हा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध थेट इशारा असल्याचे समजले जात आहे. मात्र, या अफवांबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. आज कर्नाटक विधानसभेत पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात सिद्धरामय्या भाजपच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात.





