सातारा | सातार्यात मंगळवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन
Updated On:

सातारा, (प्रतिनिधी) – शिवजंयतीनिमित्त सोमवार, दि. 19 रोजी शासकीय सुट्टी असल्याने, जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन मंगळवार, दि. 20 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित करण्यात आलेला आहे.
या लोकशाही दिनासाठी महिलांनी विहीत नमुन्यातील अर्ज दोन प्रतींमध्ये करणे आवश्यक आहे. तक्रार अर्ज किंवा निवेदने वैयक्तिक स्वरूपाची असणे आवश्यक आहे. महिला लोकशाही दिनी मूळ अर्ज व अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांसह उपस्थित राहणे आवश्यक आहे, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.




