वडिलांच्या वर्षश्राद्ध निमित्त संत तुकाराम गाथांचे वाटप

Updated On:
वडिलांच्या वर्षश्राद्ध निमित्त संत तुकाराम गाथांचे वाटप

पाबळ (प्रतिनिधी) – समाजातील गोरगरिबांसाठी सामाजिक उपक्रम राबवताना उद्योजक व पाबळ शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव योगेश चौधरी यांनी वडिलांच्या वर्षश्राद्ध निमित्त उपस्थितांना दोनशे संत तुकाराम गाथांचे वाटप केले. या बद्दल उपस्थितांनी संतोष व्यक्त केला.

यावेळी पंचायत समितीचे माजी अध्यक्ष सुभाष उमाप, शांताराम चौधरी,पाबळचे सरपंच मारुती शेळके, सदस्य ऋषिकेश कोल्हे, खैरेनगरचे सरपंच एकनाथ खैरे, हभप माऊली महाराज, जाधव महाराज , रामदास घाटकर व परिसरातील मान्यवर उपस्थित होते.

दरवर्षी पाबळ व परिसरातील महिलांना तीर्थयात्रा घडवणे, कोरोना कालावधीत रुग्णवाहिकांसाठी व नागरिकांसाठी स्वखर्चाने ऑक्सिजन सिलिंडर देणे,पीपीई किट देणे यासारखे अनेक उपक्रम चौधरी करत आहेत. यावेळी वडील पोपटराव चौधरी यांच्या वर्षश्राद्ध निमित्त योगेश चौधरी यांनी उपस्थितांना ग्रंथाचे वाटप केले.

आणखी संबंधित बातम्या

Election News : नाशकातही एबी फाॅर्म वाटपात गोंधळ! भाजपच्‍या दोन उमेदवारांचे अर्ज ठरले बाद

2025-12-31 20:55:18

Election News : नाशकातही एबी फाॅर्म वाटपात गोंधळ! भाजपच्‍या दोन उमेदवारांचे अर्ज ठरले बाद

pune : अपक्ष उमेदवारांना आज चिन्हांचे वाटप

2025-11-26 09:17:43

pune : अपक्ष उमेदवारांना आज चिन्हांचे वाटप

बैलपोळ्यानिमित्त नेवासा पंचायत समिती अनोखा उपक्रम

2025-08-24 13:53:40

बैलपोळ्यानिमित्त नेवासा पंचायत समिती अनोखा उपक्रम

Pune District : अंगारकीनिमित्त श्री महागणपती मंदिरात सामूहिक अथर्वशीर्ष पठन

2025-08-13 08:21:47

Pune District : अंगारकीनिमित्त श्री महागणपती मंदिरात सामूहिक अथर्वशीर्ष पठन

Pune District : अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त शिरूरमध्ये मोफत पशुवैद्यकीय तपासणी

2025-07-23 07:51:38

Pune District : अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त शिरूरमध्ये मोफत पशुवैद्यकीय तपासणी