जनस्वराज्यकडून पुण्यात घरोघरी राष्ट्रध्वजाचे वाटप
Updated On:

विश्रांतवाडी, दि. 13 (प्रतिनिधी) -स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त हर घर तिरंगा व घर घर संविधान या उपक्रमाअंतर्गत जनस्वराज्य सेनेच्यावतीने भारतीय राष्ट्रध्वज आणि संविधानाच्या उद्देशिकेचे घरोघरी जाऊन वाटप करण्यात आले.
या उपक्रमाचे आयोजन स्वराज्य सेनेचे प्रमुख राहुल प्रताप यांनी केले होते. सदर कार्यक्रमाचे नियोजन जनस्वराज्य सेनेचे मार्गदर्शक दत्तात्रय देशपांडे, संघटक कुमार शिरवाळे, गौरव कांबळे, प्रथमेश शिंदे, अभिषेक नेटके, अदित्य नेटके, यश नेटके, आदर्श शिंदे, साहिल सकट आणि कृष्णा घोडे यांनी केले.





