Ranjeet Kasale Arrest | बीड पोलिस दलातील बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासले याला अटक करण्यात आली आहे. गुजरातमधील घर फोडीतील आरोपींना मदत केल्याच्या संशयावरुन कासलेला अटक करण्यात आली आहे. या आरोपींना मदत करणे किंवा इतर सहकार्य पुरवणे अशा स्वरूपाचा संशय गुजरात पोलिसांना असल्याकारणाने त्यांनी दोन दिवसापासून रणजीत कासलेला अटक करण्यासाठी शोध मोहीम सुरू होती. लातूर पोलीस त्याचबरोबर गुजरात पोलीस यांनी एकत्रित केलेल्या मोहिमेमुळे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रणजीत कासले यास ताब्यात घेतला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यातील कागदपत्राची पूर्तता करून सहा जणांच्या पथकाने रणजीत कासले याला गुजरात येथील सुरत भागातील पाल पोलीस स्टेशनकडे घेऊन गेले आहेत. ‘पुष्पा’ चित्रपटामधील ॲक्शन वेगवेगळ्या प्रकरणी आत्तापर्यंत सात गुन्हा रणजीत कासले याच्यावर दाखल आहेत. गुजरात पोलिसांचा हा आठवा गुन्हा आहे. गुजरात पोलिस घेऊन जाताना ‘बॉसला अटक झाली’ म्हणत कासलेने ‘पुष्पा’ चित्रपटामधील ॲक्शन ही करून दाखविली. Ranjeet Kasale Arrest | व्हिडीओद्वारे अनेक खुलासे दरम्यान, बडतर्फ झाल्यानंतर रणजीत कासलेने मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हिडीओ करत अनेक खुलासे केले आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि त्यानंतर वाल्मीक कराड याबाबतच्या अनेक चित्रफिती सोशल मीडियावर रणजीत कासलेने व्हायरल केल्या होत्या. Ranjeet Kasale Arrest | त्याचबरोबर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांवर थेट आरोप केले होते. रणजीत कासलेला मुंबई गुन्हे शाखेने अटकही केली होती. तो जामीनावर बाहेर असताना आता गुजरात पोलिसांनी त्याला नव्या प्रकरणात अटक केली आहे. Ranjeet Kasale Arrest | हेही वाचा: हाँगकाँग विमानतळावर मोठी दुर्घटना! लँडिंग दरम्यान विमानाचे अनियंत्रित ; समुद्रात कोसळले कार्गो विमान; व्हिडिओ