बीड – जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह सरकारवर टीका करणारे बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासले यांच्या विरोधात अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
मुलाच्या शैक्षणिक शुल्कासाठी पैशांची गरज आहे, म्हणून रणजीत कासले यांनी सुदर्शन काळे यांच्याकडून रुपये १० लाख घेतले होते. त्यातील अडीच लाख रुपये परत केले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. परळी विधानसभा निवडणुकीच्या काळात स्ट्रॉंग रूमपासून दूर राहण्यासाठी धनंजय मुंडे यांच्या माणसाने १० लाख रुपये दिल्याचा दावा रणजीत कासले यांनी केला होता. परंतु त्यांचा हा दावा खोटा असल्याचे समोर आले आहे.
कासले सध्या छत्रपती संभाजीनगर येथील हार्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. कासले यांना बीडच्या कारागृहात जीवाला धोका असल्याने छत्रपती संभाजीनगर येथे आणण्यात आले आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड, सुदर्शन घुले व इतर आरोपी हे बीड कारागृहात आहेत.
कासले यांनी या आरोपींवर गंभीर आरोप केले होते. एका अॅट्रॉसिटी प्रकरणात सध्या रणजित कासले न्यायालयीन कोठडीत आहेत. कासले यांच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाणे, अंबाजोगाई शहर पोलिस ठाणे आणि परळी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.