दिशा पटानीचा मिस्ट्री बॉय सोबतचा ‘तो’ फोटो झाला लीक; जाळीदार ड्रेस मध्ये दिसला बोल्ड अंदाज

Updated On:
Photo 1

मुंबई – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ‘दिशा पटानी’ आपल्या ड्रेसिंग स्टाईल आणि बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. दिशा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून, तिच्या क्रेझी लूकने चाहत्यांना नेहमीच घायाळ करते. दिशाच्या ग्लॅमर्स फोटोंशिवाय तिच्या लव्ह लाईफबद्दलही बरीच चर्चेत असते. दिशा अभिनेता टायगर श्रॉफसोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र, आता दिशा एका हँडसम हंकसोबत असल्याचं पाहायला मिळत आहे. बऱ्याच वेळा या दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आले आहे.

दिशाची लोकप्रियता तिच्या सोशल मीडियावरील फॉलोवर्सच्या संख्येतूनच अधोरेखित होते. लाखो तरुणांच्या हृदयाची धडकन असलेली दिशा सध्या टायगर श्रॉफला सोडून अलेक्झांडर अॅलेक्स इलिक या हँडसम हंकसोबत रिलेशनशिप मध्ये आहे. अलेक्झांडर दिसण्यात जितका डॅशिंग आहे तितकाच तो फिटनेस फ्रीक आहे.

दिशा पटनीच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तुम्हाला या दोघांचे अनेक फोटो पाहायला मिळतील. अलेक्झांडर दिशाचा जिम फ्रेंड आहे. दोघे एकत्र वर्कआउट करतात. सर्बियाचा रहिवासी असलेला अलेक्झांडर हा देखील अभिनेता आहे. सध्या अलेक्झांडर मुंबईत राहत असून, दिशा सोबत रिलेशनशिप मध्ये आहे.

दरम्यान, नुकतंच या दोघांना मुंबईत एका पार्टीमध्ये सोबत स्पॉट करण्यात आलं आहे. यावेळी ब्लॅक रंगाच्या जाळीदार ड्रेसमध्ये दिशा खूपच हॉट दिसत होती. दिशा पटानी आजकाल तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. टायगर श्रॉफसोबतच्या ब्रेकअपनंतर दिशा पटानीची लव्ह लाईफ सध्या जोरदार चर्चेत आहे.

काल 22 डिसेंबर रोजी मोहित रायने एका पार्टीचे आयोजन केले होते, ज्यामध्ये दिशा पटानी बॉयफ्रेंड अलेक्झांडर सोबत पोहोचली होती. दोघांची जोडी खूप छान दिसत होती. आणि अलेक्झांडरही फुल पार्टी मूडमध्ये दिसत होता. यावेळी त्याने काळ्या शर्टसोबत जीन्स घातली होती. ज्यामध्ये तो खूपच डॅशिंग दिसत होता. अलेक्झांडरने त्याच्या इंस्टाग्रामवर दिशासोबतचा मिरर सेल्फीही पोस्ट केला आहे. दोघेही लिफ्टमध्ये सेल्फी घेताना दिसत आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्तींना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा, मिळाले ‘हे’ पद

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्तींना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा, मिळाले ‘हे’ पद

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका