पश्चिम आशियातील युध्द थांबवण्यासाठी चर्चा सुरू

तेल अवीव – अमेरिका आणि काही अरब देश इराण आणि इस्रायलसोबत युद्धबंदीसाठी बोलणी करत आहेत. मंगळवारी एका इस्रायली टेलिव्हिजन चॅनल 12 ने आपल्या अहवालात म्हटले आहे की या गुप्त चर्चेचा उद्देश गाझा आणि लेबनॉनसह सर्व आघाड्यांवर लढाई थांबवणे आहे. अहवालात असेही म्हटले आहे की, इस्रायलचा सध्या या उपक्रमात सहभाग नाही, परंतु याविषयी इस्रायलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे.
गाझा पट्टीतील युद्ध थांबवण्यासाठी कोणत्या प्रकारच्या अटींवर चर्चा केली जाते आहे याची माहिती उघड झालेली नाही. मात्र ओलिसांची सुटका झाल्यानंतरही युध्द सुरू ठेवण्याचे इस्त्रायलने दिलेले संकेत आणि कोणत्याही समझोता झाला तरी इस्त्रालयलने गाझातून माघार घ्यावी अशी हमासची मागणी आहे. त्यामुळे यावर तोडगा काढणे अधिक जटिल आहे.
एका वरिष्ठ इस्रायली अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही सध्या चांगल्या स्थितीत आहोत, त्यामुळे युद्धविराम आमच्या अटींवर होईल. आम्ही लिटानी नदीतून हिजबुल्लाची माघार आणि सीमेजवळील भागातून हिजबुल्लाची ठिकाणे काढून टाकण्याची अट घालू. तर हिजबुल्लाने लेबनॉनमधील युध्दविरामाची अट म्हणून गाझामधील युद्धविरामाची आपली मागणी सोडण्याचे संकेत दिले आहेत.
हिजबुल्लाचे उपनेते, नइम कासेम यांनी मंगळवारी एका टेलिव्हिजन भाषणात सांगितले की ते लेबनीज संसदेचे स्पीकर नबीह बेरी यांच्या बिनशर्त युद्धविराम करण्याच्या प्रयत्नांना समर्थन देतात. कार्नेगी मिडल ईस्ट सेंटरचे तज्ज्ञ म्हणाले की सध्या इस्रायल सक्षम आहे हिजबुल्लावर लष्करी दबाव वाढवून आपली बाजू अधिक भक्कम करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने म्हटले आहे की, हिजबुल्लाहच्या युद्धविरामाच्या मागणीतून संकेत मिळत आहेत की ते मागे हटले आहे. हिजबुल्लाहने आता आपला सूर बदलला आहे. या संघर्षावर कुटनितीच्या माध्यमातून तोडगा काढायचा आहे, असे ते म्हणाले.





