मुंबई – महाविकास आघाडीवर नाराज शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंडखोरी करत भाजपसोबत राज्यात सत्ता स्थापन केली. आता शिवसेनेत खासदारसुद्धा बंडखोरीच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला 7 खासदार गैरहजर होते.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात पक्षाच्या भूमिकेबाबत चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली आहे. यात एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा द्यावा, अशी भूमिका काही खासदारांनी घेतल्याचेही समोर आले आहे.
बैठकीत लोकसभेतील 19 पैकी 12 खासदार उपस्थित होते, तर 7 खासदार अनुपस्थित होते. तसेच, राज्यसभेतील 3 पैकी संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी हे दोन खासदार उपस्थित होते. तर, खासदार अनिल देसाई हे दिल्लीत असल्याने बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत.
शिंदे मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वीच संभाव्य मंत्र्याला करोनाची बाधा
बैठकीला लोकसभेचे गजानन कीर्तिकर, अरविंद सावंत, विनायक राऊत, हेमंत गोडसे, धैर्यशील माने, प्रताप जाधव, सदाशिव लोखंडे, राहुल शेवाळे, श्रीरंग बारणे, राजन विचारे, ओमराजे निंबाळकर, राजेंद्र गावित हे खासदार उपस्थित होते. तर, भावना गवळी, संजय जाधव, संजय मंडलिक, हेमंत पाटील, श्रीकांत शिंदे, कृपाल तुमाने, कलाबेन डेलकर अनुपस्थितांमध्ये यांचा समावेश आहे.
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय! “येत्या निवडणुका ओबीसी आरक्षणासहित होत नसतील तर….”