महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षावरच “आपत्ती’
Updated On:

पुणे – महापालिकेच्या मुख्य इमारतीत अखेर करोनाने शिरकाव केला असून, अग्निशमन दलाच्या जवानास करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन कक्षात तातडीने औषध फवारणी करण्यात आली आहे.
महापालिकेच्या चौथ्या मजल्यावर आयुक्तांचे, तर पाचव्या मजल्यावर आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कार्यालय आहे. येथून सध्या करोनाबाधित रुग्णांचे ट्रेसिंग सुरू आहे. तसेच शहरात तातडीची मदत पुरविण्याची जबाबदारी या विभागावर आहे.
येथे पावसाळ्यात पूर नियंत्रण कक्ष सुरू असेल. येथील कर्मचाऱ्यासह अग्निशमनदल, पोलीस तसेच सुरक्षा विभागाचे कर्मचारी 3 शिफ्टमध्ये कार्यरत असतात. हा अग्निशमन दलाचा जवानही येथे कार्यरत होता. अग्निशमनदलाकडून एका कर्मचाऱ्यास लागन झाल्याने या विभागाने सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.





