Satej Patil : मोठी बातमी! काँग्रेसने सतेज पाटलांवर सोपवली महत्वाची जबाबदारी
Satej Patil : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या समित्यांवर पक्षातील अनुभवी आणि वरिष्ठ नेत्यांची नियुक्ती केली आहे.

Satej Patil : आगामी पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने मोठी संघटनात्मक तयारी सुरू केली आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांसाठी काँग्रेसकडून स्वतंत्र स्क्रीनिंग कमिट्यांची स्थापना करण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या समित्यांवर पक्षातील अनुभवी आणि वरिष्ठ नेत्यांची नियुक्ती केली आहे.
विशेष म्हणजे, गोवा राज्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या स्क्रीनिंग कमिटीमध्ये महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आणि आमदार सतेज पाटील यांना स्थान देण्यात आले आहे. ही महत्त्वाची जबाबदारी मिळाल्यानंतर सतेज पाटील यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत काँग्रेस पक्षाचे आभार मानले आहेत.
पाच राज्यांच्या स्क्रीनिंग कमिटीवर कोणाची नियुक्ती?
काँग्रेसने पाचही राज्यांसाठी स्वतंत्र समित्या स्थापन केल्या असून, प्रत्येक समितीमध्ये एक अध्यक्ष आणि दोन सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. या नियुक्त्यांनुसार उत्तर प्रदेशच्या स्क्रीनिंग कमिटीच्या अध्यक्षपदी अजय माकन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Grateful to Congress President Shri @kharge ji, Leader of Opposition Shri @RahulGandhi ji, AICC General Secretary Shri @kcvenugopalmp ji and the entire party leadership for entrusting me with the responsibility of being a member of the screening committee for the upcoming Goa Assembly elections along with Shri @thekjgeorge ji and Shri @shafi_parambil_ ji.
Together with our @INCGoa workers, we will work to field strong candidates rooted in the people and win the elections in Goa.
@INCIndia
— Satej (Bunty) D. Patil (@satejp) November 17, 2026
पंजाबच्या स्क्रीनिंग कमिटीच्या अध्यक्षपदी सिरिवेला प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तराखंडच्या समितीचे अध्यक्षपद दीपा दासमुन्शी यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. तर गोवा राज्यासाठी के. जे. जॉर्ज यांच्या अध्यक्षतेखाली स्क्रीनिंग कमिटी स्थापन करण्यात आली आहे. मणिपूरच्या समितीच्या अध्यक्षपदी बी. एम. संदीप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
स्क्रीनिंग कमिटीवर नेमकी काय जबाबदारी असणार?
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या स्क्रीनिंग कमिट्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची पार्श्वभूमी तपासणे, पक्षातील त्यांचे योगदान आणि कामगिरीचा आढावा घेणे, तसेच संबंधित उमेदवाराची निवडून येण्याची क्षमता तपासणे, अशी महत्त्वाची जबाबदारी या समित्यांवर असणार आहे. या प्रक्रियेनंतर उमेदवारांच्या नावांची छाननी करून पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला शिफारसी केल्या जातील.
Oranges Side Effects: संत्री आरोग्यासाठी फायदेशीर, पण ‘या’ ५ लोकांनी खाण्यापूर्वी घ्यावी काळजी!






