IPL 2024 : दिनेश कार्तिकचा ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू’ला आणखी एक धक्का…

Dinesh Karthik IPL 2024 (बंगळुरु) – भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने निवृत्तीच्या बातम्यांदरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (आरसीबी) आणखी एक धक्का दिला आहे. दिनेश कार्तिक आयपीएल स्पर्धेनंतर क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. तसेच आता तो आरसीबीच्या सलामीच्या सामन्यातही मैदानात उतरणार नाही. कार्तिक दुखापतीमुळे किमान दोन सामन्यांतून बाहेर आहे.
कार्तिक हा २००८ सालच्या पहिल्या आयपीएलपासून खेळतोय. धोनीप्रमाणे तो देखील सर्वात जुना आयपीएल खेळाडू आहे. तो आतापर्यंतच्या १६ मोसमात केवळ दोनच सामन्यात खेळला नव्हता. कार्तिक यंदाच्या स्पर्धेनंतर निवृत्ती घेणार आहे, असे खुद्द बीसीसीआयनेच सांगितले आहे. तसेच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेईल.
कार्तिक आतापर्यंत 6 आयपीएल संघांकडून खेळला आहे. तो २००८ ते २०११ पर्यंत दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळला. त्यानंतर २०१२ पर्यंत किंग्ज इलेव्हन पंजाब आणि १३ पर्यंत मुंबई इंडियन्सकडून खेळला. २०१४ मध्ये तो पुन्हा दिल्ली कॅपिटल्सकडे गेला. एका मोसमानंतर त्याने २०१५ मध्ये आरसीबीशी करार केला. मात्र एकाच वर्षात त्याने बंगळुरु संघही सोडला.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/most-sixes-in-test-rohit-sharma-equals-viv-richards/
२०१६-१७ साली गुजरात लायन्समध्ये काढल्यानंतर त्याने केकेआरशी करार केला. त्यावेळी तो संघाचा कर्णधार देखील होता. मात्र २०२२ मध्ये केकेआरने त्याला रिलीज केले अन् तो पुन्हा आरसीबीकडे परतला.





