‘बॉर्डर २’ मधील दिलजीत दोसांझचा पहिला लुक समोर

Diljit Dosanjh First Look | ‘बॉर्डर’ या देशभक्तीपर सिनेमाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली. त्यानंतर आता ‘बॉर्डर 2‘ सिनेमाची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. बॉर्डर’च्या पहिल्या भागात सुनील शेट्टीही सनी देओलसोबत दिसला होता. मात्र, यावेळी त्याचा मुलगा अहान दिसणार आहे. यात सनी देओल, अहान शेट्टीसह वरुण धवन आणि दिलजीत दोसांझ हे कलाकार देखील पाहायला मिळणार आहेत. याचदरम्यान या चित्रपटातील दिलजीत दोसांझचा फर्स्ट लूक समोर आला आहे.
दिलजीत दोसांझने सोशल मीडियावर ‘बॉर्डर २‘चा पहिला लूक शेअर केला आहे. या व्हिडीओत बॅकग्राऊंडला ‘संदेसे आते है’ या बॉर्डरच्या गाजलेल्या गाण्याचं म्युझिक आहे. तर दिलजीत दोसांझ एअर फोर्स युनिफॉर्ममध्ये चालत येत आहे. यासोबत त्याने लिहिले, ‘इस देश के आसमान मे गुरु के बाज पेहरा देते है’.
दिलजीतच्या या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे. सोशल मिडियावर त्याच्या लुकला चाहत्यांकडूनही मोठी पसंती मिळत असल्याचे दिसत आहे. Diljit Dosanjh First Look |
View this post on Instagram
दिलजीत ‘बॉर्डर २’मध्ये तो भारतीय हवाई दलाचे अधिकारी निर्मलजीत सिंग सेखोन यांची भूमिकेत दिसणार आहे. त्यांना भारत-पाकिस्तान युद्धात त्यांच्या शौर्यासाठी मरणोत्तर परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले होते. Diljit Dosanjh First Look |
भूषण कुमार आणि कृष्ण कुमार हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. हा सिनेमा सिनेमा पुढील वर्षी २६ जानेवारी रोजी रिलीज होणार आहे. दिलजीतच्या या लुकनंतर आता चाहत्यांची या चित्रपटाबाबची उत्सुकता अधिक वाढली आहे. Diljit Dosanjh First Look |
हेही वाचा:
शरद पवारांचा पक्ष निवडणुकीत सक्रिय नसल्याचे चित्र; बालेकिल्ल्यातूनच ‘तुतारी’ गायब?





