MS Dhoni Birthday : माहीने रांचीमध्ये मित्रांसोबत साधेपणाने साजरा केला वाढदिवस, VIDEO होतोय व्हायरल

MS Dhoni 44th Birthday : क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेला महेंद्रसिंग धोनी आपल्या साध्या स्वभावासाठी ओळखला जातो. २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही तो चर्चेत आहे. आज धोनीने आपला ४४वा वाढदिवस साजरा केला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये धोनी आपल्या मित्रांसोबत अगदी साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत.
महेंद्र सिंग धोनीने साजरा केला वाढदिवस –
पाच वेळा आयपीएल विजेता कर्णधार आणि तीनही आयसीसी स्पर्धा जिंकणारा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आज ४४ वर्षांचा झाला आहे. धोनी आपला ४४वा वाढदिवस रांची येथे आपल्या मित्रांसोबत साजरा केला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये धोनी जिमवेअर घालून केक कापताना दिसत आहेत.
MS Dhoni celebrating his 44th Birthday 😍❤️ pic.twitter.com/SYVATE9FUG
— ` (@WorshipDhoni) July 7, 2025
या व्हिडिओमध्ये धोनी पूर्णपणे तंदुरुस्त दिसत आहेत. निवृत्तीनंतर धोनी सातत्याने साधेपणाने वाढदिवस साजरा करताना दिसतो. मात्र, चाहत्यांना साक्षी धोनीच्या नव्या पोस्टची उत्सुकता असते. धोनी स्वतः सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसतो, त्याची पत्नी साक्षीच त्याच्या वाढदिवसाची पोस्ट जर वर्षी शेअर करत असते.
हेही वाचा – Prithvi Shaw : पृथ्वी शॉचा मुंबई क्रिकेटला रामराम! आता आगामी हंगामात ‘या’ संघासाठी खेळणार
चाहत्यांना माहीच्या पुनरागमनाची उत्सुकता –
दोन दिवसांपूर्वी महेंद्र सिंग धोनीने आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला होता. यावेळीही धोनीने कोणतीही पोस्ट केली नव्हती, परंतु साक्षीने दोन पोस्ट शेअर केल्या होत्या. महेंद्र सिंग धोनी आता फक्त आयपीएलदरम्यानच खेळताना दिसतो. त्यानी अद्याप आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केलेली नाही. त्यामुळे चाहत्यांच्या मनात प्रश्न आहे की, धोनी आयपीएल २०२६ खेळताना दिसेल की नाही? याबाबत धोनीने अद्याप कोणतेही स्पष्ट संकेत दिलेले नाहीत.
हेही वाचा – WI vs SA : वियान मुल्डरचे ऐतिहासिक त्रिशतक! ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच खेळाडू
धोनीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द –
धोनीने २३ डिसेंबर २००४ रोजी बांगलादेशविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, तर १५ ऑगस्ट २०२० रोजी त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यादरम्याने धोनीने भारतासाठी ९० कसोटी सामने खेळले आहेत. या कालावधीत त्यानी ३०.०९ च्या सरासरीने ४,८७६ धावा केल्या, ज्यात ६ शतके आणि ३३ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे, ३५० एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यांनी ५०.५७ च्या सरासरीने १०,७७३ धावा केल्या. ९८ टी-२० सामन्यांमध्ये धोनीने १,६१७ धावा केल्या. महेंद्र सिंह धोनीन २३ डिसेंबर २००४ रोजी बांगलादेशविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, तर १५ ऑगस्ट २०२० रोजी त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.





