‘माझ्या नावावर वेगळे फोटो येतात…’; एकसारखी नावे अभिनेत्रीसाठी ठरली डोके दुखी, सोनाली कुलकर्णीने मांडली व्यथा….

Sonali Kulkarni : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले असून, अभिनेत्री सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असते. तसेच समाजातील अनेक लहान-मोठ्या चुकीच्या गोष्टींवर सुद्धा आपले मत अतिशय स्पष्टपणे मांडत असते.
नुकतंच, सिनिअर सोनाली कुलकर्णीने एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली होती. यावेळी तिने आपल्या मनातील एक खंत बोलून दाखवली आहे. सारख्या नावांमुळे आपल्याला त्रास सहन करावा लागतोय असं तिने म्हटलं. मराठी चित्रपटसृष्टीत दोन ‘सोनाली कुलकर्णी’ नावाच्या अभिनेत्री असल्यामुळे हा गोंधळ उडत असल्याचं दिसून येत आहे.
यावर बोलताना सिनिअर सोनाली कुलकर्णी म्हणाली की, ‘इतकी वर्ष काम करूनही मला सांगावं लागतं की मी कोणती ‘सोनाली’ आहे. अनेक कार्यक्रमांचे मला चुकीचे फोन येतात. मी दुसऱ्या सोनालीला यासंदर्भात अनेकदा फोन केला.
तिने इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वी आपल्या नावात काहीतरी बदल करायला हवा होता. जसं कियारा अडवाणीने केला होता. गुगल सर्च केल्यानंतर माझ्या नावावर वेगळे फोटो येतात त्यामुळे मी काहीच केलेलं नाही असं वाटतं. हे सगळं टाळता आलं असतं.’असं अभिनेत्री म्हणाली.
View this post on Instagram
अलिकडंच मी वाचलं की कियारा अडवाणीचं खरं नाव आलिया आहे. पण तिने सिनेसृष्टीत येण्याआधी तिचं नाव बदललं. कारण या क्षेत्रात ऑलरेडी एक आलिया आहे. त्या दोघींचं आडनावही वेगळं आहे.
तरिही तिने त्या मुलीच्या अस्तित्वाची आणि स्वत: च्या अस्तित्वाची काळजी घेण्यासाठी तिने स्वत: नाव बदललं. सगळ्यांना आपल्या नावाचा स्वाभिमान असणं स्वाभाविक आहे. पण माझा त्रास मी दररोज पचवण्याचा प्रयत्न करते, असं देखील अभिनेत्री यावेळी म्हणाली.
नेटकरी काय म्हणतात पाहा….
सोनालीच्या या पोस्टर नेटकरी म्हणाले की, ‘तुमच्या नावापेक्षा तुमचं काम बोलतं. आम्हाला तुमचं काम ठाऊक आहे. तुम्ही उत्तम अभिनेत्री आहात. त्यामुळे नावाचा गोंधळ हा काही एवढ्या चिंतेचा विषय नाही.’
तर दुसरा युजर्स म्हणाला की, तिचं नाव ही तिची ओळख आहे. तिने तरी तिचं नाव का बदलावं. सगळ्यात शेवटी प्रेक्षक महत्वाचा आणि आम्हाला तुम्ही दोघीही तितक्याच प्रिय आहात. अश्या प्रतिक्रिया नेटकरी करत आहेत.





