Diesel Price Hike : डिझेल दरवाढीचा भडका उडणार? निर्यात शुल्कात ३४ रुपयांची प्रचंड वाढ; महागाईचा फटका बसण्याची भीती
Diesel Price Hike : केंद्र सरकारने डिझेलवरील निर्यात शुल्क २१.५० रुपयांवरून ५५.५० रुपये केले आहे. यामुळे देशांतर्गत पुरवठा वाढणार असला तरी सामान्यांसाठी डिझेल महाग होण्याची शक्यता आहे.

Diesel Price Hike : केंद्र सरकारने देशांतर्गत इंधनाचा पुरवठा कायम राखण्यासाठी आणि महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी हाय-स्पीड डिझेलवरील निर्यात शुल्कात मोठी वाढ केली आहे. या निर्णयामुळे भविष्यात डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Diesel Price Hike)
सरकारने डिझेलवरील निर्यात शुल्क २१.५० रुपये प्रति लिटरवरून थेट ५५.५० रुपये प्रति लिटरपर्यंत वाढवले आहे. तसेच इन्फ्रा सेसमध्येही ३६ रुपये प्रति लिटरची वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी २६ मार्च रोजीही डिझेल आणि एटीएफवर निर्यात शुल्क लागू करण्यात आले होते.
निर्यात शुल्क वाढवल्यामुळे तेल कंपन्यांसाठी परदेशात इंधन विक्री कमी आकर्षक होणार असून, देशांतर्गत पुरवठा वाढवण्याचा सरकारचा उद्देश आहे. मात्र, याचा परिणाम स्थानिक बाजारातील किमतींवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तज्ज्ञांच्या मते, या निर्णयामुळे वाहतूक खर्च वाढू शकतो, ज्याचा परिणाम वस्तूंच्या किमतींवर होऊन सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसू शकतो. (Diesel Price Hike)





