अनफिट समझा क्या? सुपरफिट है मैं! रोहित शर्माला ‘लठ्ठ’ म्हणणाऱ्या काँग्रेसला भाजपाने सुनावलं

Rohit Sharma | Shama Mohamed : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला चार विकेट्सने पराभूत करून विजेतेपद पटकावले आहे. हे भारताचे हे आयसीसी स्पर्धेतील सलग दुसरे जेतेपद आहे.
यापूर्वी २०२४ मध्ये टीम इंडियाने टी-२० विश्वचषक जिंकला होता. त्याचबरोबर भारताने १२ वर्षांनंतर तिसरी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. भारताने २५२ धावांचे लक्ष्य ४९ षटकांत ६ विकेट्स गमावून पूर्ण केले. भारतासाठी कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ७६ धावांचे योगदान दिले.
दरम्यान, अश्यातच भाजपाने ट्विट करत काँग्रेसचा समाचार घेतल्याचं दिसून आलं आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी कर्णधार रोहित शर्माच्या फिटनेसवर भाष्य केल्यामुळे राजकीय वाद निर्माण झाला. एक खेळाडू म्हणून रोहित शर्मा ‘लठ्ठ’ आहे.
त्याने वजन कमी करण्याची गरज आहे अशी टिप्पणी करतानाच शमा मोहम्मद यांनी रोहित शर्माच्या कर्णधारपदावरही प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी रोहितच्या कर्णधारपदाला अप्रभावी म्हटले होते. मात्र, आता भाजपाने काँग्रेसला खोचक टोला लगावला आहे.
त्यांनी आपल्या ट्विटमध्ये कर्णधार रोहित शर्माचा एक फोटो शेअर केला असून यामध्ये “अनफिट समझा क्या? सुपरफिट है मैं! असं लिहलं आहे. या सोबतच रोहित तुमच्यासाठी खूप खूप शुभेच्छा!” असं कॅप्शन ऍड करण्यात आलं आहे.
𝐑𝐨𝐡𝐢𝐭 𝐒𝐡𝐚𝐫𝐦𝐚’𝐬 𝐛𝐞𝐟𝐢𝐭𝐭𝐢𝐧𝐠 𝐚𝐧𝐬𝐰𝐞𝐫 𝐭𝐨 𝐂𝐨𝐧𝐠𝐫𝐞𝐬𝐬!#ChampionsTrophy2025 #RohitSharma pic.twitter.com/CzclJlb8VF
— BJP (@BJP4India) March 9, 2025
शमा मोहम्मद नेमकं काय म्हणाल्या?
शमा मोहम्मदने ‘X’ वर लिहिले, ‘रोहित शर्मा खेळाडू म्हणून जाड आहे. त्याला वजन कमी करायचे आहे. तसेच, तो भारतीय संघाचा आतापर्यंतचा सर्वात निराशाजनक कर्णधार आहे. दुसऱ्या एका पोस्टमध्ये त्याने म्हटले आहे की, गांगुली, तेंडुलकर, द्रविड, धोनी, कोहली, कपिल देव, शास्त्री यांसारख्या माजी खेळाडूंच्या तुलनेत त्याच्यात असे काय खास आहे. तो एक सरासरी कर्णधार आहे आणि त्याचबरोबर एक सरासरी खेळाडू आहे ज्याला भारताचा कर्णधार होण्याचा मान मिळाला आहे’.
वाद वाढताच डॉ. शमा मोहम्मद यांचा यू-टर्न :
काँग्रेसच्या सूचनांनंतर आणि सर्व गोंधळ पाहून शमा मोहम्मद यांनी त्यांची वादग्रस्त पोस्ट डिलीट केली आहे. त्या म्हणाल्या की, ‘खेळाडूंच्या फिटनेसबाबत हे एक सामान्य ट्विट होते. हे बॉडी शेमिंगबद्दल नव्हते. मला वाटलं त्याचं वजन जास्त आहे, म्हणूनच मी ट्विट केलं. मला कोणत्याही कारणाशिवाय लक्ष्य केले जात आहे. लोकशाहीत बोलण्याचा अधिकार आहे. मी फक्त माझा मुद्दा मांडला.
जेव्हा मी त्याची तुलना माजी कर्णधारांशी केली तेव्हा तीही चुकीच्या पद्धतीने घेतली गेली. मला म्हणायचे होते ते म्हणजे विराट कोहलीकडे पाहा. तो त्याच्या सहकारी खेळाडूंना कसे प्रोत्साहन देतो. मी हे देखील सांगू इच्छितो की जेव्हा भारतीय संघ पाकिस्तानकडून सामना हरला तेव्हा बरेच लोक मोहम्मद शमीला लक्ष्य करत होते. त्यावेळी विराट कोहली शमीसोबत उभा होता.
भारताने सातव्यांदा आयसीसी ट्रॉफीवर कोरलं नाव :
ही भारताची सातवी आयसीसी ट्रॉफी आहे. यापूर्वी, संघाने १९८३ आणि २०११ चा एकदिवसीय विश्वचषक, २००७ आणि २०२४ चा टी-२० विश्वचषक आणि २००२, २०१३ आणि २०२५ ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. संपूर्ण स्पर्धेत भारत अपराजित राहिला. भारतीय संघाने सलग पाच सामने जिंकत चॅम्पियन्स ट्रॉफीवर तिसऱ्यांदा नाव कोरले.





