धनंजय मुंडेंनी शपथ पत्रात माहिती लपवली? करुणा शर्मांच्या याचिकेवर सुनावणी लांबली

मुंबई – विधानसभा निवडणुकीमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या शपथ पत्रात खोटी माहिती दिली असल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी परळी फौजदारी न्यायालयात ऑनलाइन पद्धतीने तक्रार दाखल केली होती.
या तक्रारी संदर्भात मंत्री धनंजय मुंडे यांना न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस देखील बजावली होती. या संदर्भात आज परळीच्या न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र, त्यासाठी आता 15 मार्चला सुनावणी होणार आहे. त्यामुळे न्यायालयाच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
धनंजय मुंडे यांनी 2024 मध्ये परळी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जा सोबतच्या शपथ पत्रात पत्नी राजश्री मुंडे आणि तीन मुले तसेच करुणा शर्मा यांच्या दोन मुलांचा उल्लेख केला होता.
मात्र करुणा शर्मा यांच्या नावावरील मिळकतीचा कोणताही उल्लेख केला नव्हता. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी मिळकतीची माहिती लपवण्याचा आरोप करूणा शर्मा यांनी केला आहे.





