Dhurandhar The Revenge : रणवीर सिंगचा खतरनाक लुक; पहिलं पोस्टर रिलीज
Dhurandhar The Revenge : १२.१२ या वेळेने चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली

Dhurandhar The Revenge : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा ‘धुरंधर’ चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटातील रणवीरसह अभिनेता अक्षय खन्नाच्या भूमिकेचे मोठे कौतुक झाले.
या चित्रपटाच्या पहिल्या भागाला मिळालेल्या यशानंतर चाहते दुसऱ्या भागाची देखील चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. यातच आता बहुप्रतिक्षित चित्रपट ‘धुरंधर २’बाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
या चित्रपटाचे पूर्ण नाव ‘धुरंधर: द रिव्हेंज’ असे आहे. मंगळवारी, ३ फेब्रुवारी २०२६ रोजी निर्मात्यांनी या चित्रपटाचे नवीन आणि अत्यंत प्रभावी पोस्टर प्रदर्शित केले आहे. पोस्टरची पार्श्वभूमी लाल रंगाची असून ती चित्रपटातील थरार आणि ॲक्शनकडे सर्वांचं लक्ष वेधत आहे.
View this post on Instagram
यात रणवीर सिंगचा हिंसक लूक दिसत आहे. पावसाने भिजलेला रणवीर, अंगात काळे लेदर जॅकेट आणि चेहऱ्यावर सूडाची भावना स्पष्टपणे दिसून येत आहे. दुसरे म्हणजे पोस्टरवरील “१२.१२” या वेळेने चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली आहे. आज १२.१२ यावेळेत चित्रपटाचा टीजर रिलीज होणार आहे.
या पोस्टरने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली असून आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली रणवीरचा ॲक्शन अवतार पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या चित्रपटात रणवीर सिंगसोबत इतर कोणते कलाकार दिसणार आणि कथा काय असणार, याचा उलगडा लवकरच टीझरमधून होईल.
दरम्यान, आदित्य धर यांचा अलीकडील ‘धुरंधर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत इतिहास रचला आहे. आता ‘धुरंधर 2’कडूनही लोकांना तशाच अपेक्षा आहेत. हा चित्रपट 19 मार्च 2026 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा:





