Dhurandhar Box Office Collection: रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ची तुफानी सुरुवात; पहिल्याच दिवशी कमावले तब्बल ‘इतके’ कोटी रुपये!

Dhurandhar Box Office Collection: रणवीर सिंहचा बहुप्रतिक्षित ‘धुरंधर’ अखेर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे आणि रिलीज होताच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळूनही, प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे चित्रपटाने दमदार ओपनिंग नोंदवली आहे.
पहिल्या दिवसाची कमाई प्रभावी
या शुक्रवारी ‘धुरंधर’सोबत इतर कोणताही मोठा चित्रपट रिलीज न झाल्याने रणवीरच्या चित्रपटाला मोठा फायदा मिळाला. ५ डिसेंबर २०२५ रोजी एकट्यानेच बॉक्स ऑफिस काबीज करत ‘धुरंधर’ला प्रेक्षकांची चांगली गर्दी लाभली.
सॅकनिल्कच्या अंदाजानुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी २१.७७ कोटी रुपयांची कमाई केली आहे. अधिकृत आकडेवारी आल्यानंतर हा आकडा आणखी वाढू शकतो. जवळपास २२ कोटींची ओपनिंग ही कोणत्याही चित्रपटासाठी मजबूत पकड मानली जाते.
हिट चित्रपटांचे रेकॉर्ड मोडण्याची चिन्हे
पहिल्या दिवसाच्या कलेक्शनवरून पाहता, ‘धुरंधर’ या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवू शकतो. वीकेंडला कलेक्शन आणखी वाढेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.





