ST Bus Accident : धुळे-म्हसदी मार्गावर एसटीला अपघात; ४० ते ४५ विद्यार्थी जखमी
ST Bus Accident : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील म्हसदी गावाजवळ एसटी बस आणि ट्रकचा अत्यंत भीषण अपघात घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ST Bus Accident : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील म्हसदी गावाजवळ एसटी बस आणि ट्रक यांच्या भीषण अपघाताची घटना घडली. धुळे-म्हसदी मार्गावरून धावणा-या एका बसला ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात शाळेत आणि कॉलेजमध्ये जाणा-या ४० ते ४५ विद्यार्थ्यांसह प्रवासी जखमी झाले आहेत. (ST Bus Accident)
अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अपघाताच्या वेळी बसमध्ये शाळा आणि कॉलेजमध्ये जाणा-या विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होती. (ST Bus Accident)
ट्रकची धडक इतकी भीषण होती की बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या दुर्दैवी घटनेत ४० ते ४५ विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यापैकी ५ ते ६ विद्यार्थ्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे समजते. (ST Bus Accident)
अपघातानंतर जखमी विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गंभीर जखमी विद्यार्थ्यांवर वैद्यकीय पथकाकडून तातडीने उपचार सुरू आहेत. अपघाताची बातमी पसरताच पालकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली असून परिसरात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. पोलिस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत. (ST Bus Accident)
Accident News : पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, चार जण जखमी





