धीरज घाटे पुन्हा शहराध्यक्ष, प्रदिप कंद यांना उत्तर पुणे; राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातील जिल्हाध्यक्षांचा निर्णय ‘पेडिंग’! कारण…

Pune News : नुकतीच भारतीय जनता पार्टीकडून महाराष्ट्रातील जिल्ह्यांकरिता जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर करण्यात आली. पुणे शहराध्यक्ष पदी पुन्हा एकदा धीरज घाटे यांची वर्णी लागली आहे. या पदाकरिता भाजपमध्ये अनेकांची नावे चर्चित होती. मात्र, पक्षाने पुन्हा एकदा पुणे शहराध्यक्ष म्हणून धीरज घाटे यांची निवड केली आहे. तर उत्तर पुणेकरिता प्रदिप कंद यांना भाजपने संधी दिली आहे. त्यानुसार दोन जिल्हाध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. मात्र, दक्षिण पुणे जिल्ह्याचा अर्थात बारामीतीचा अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता लागली आहे. महिनाभर प्रक्रिया राबवूनही भाजपला राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातील अध्यक्ष निवडता आलेला नाही.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीध मोहोळ आणि दौडंचे आमदार राहुल कुल यांनी कंद यांच्यासाठी सक्रिय भूमिका घेतली होती. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांची भाजपकडून मावळ जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. जिल्हा आणि तालुका स्तरावर एकसूत्रीपणा आणण्यासाठी भाजकडून प्रयत्न सुरू असून शहरी भागातील ग्रामीण पट्टा या ठिकाणी अद्यापही जातीय समिकरणे, पारंपारिक वर्चस्व आणि स्थानिक प्रभावशाली नेत्यांचे वजन ठरवणारे घटक आहेत. त्यातच शहरी भागालतचा जिल्हाध्यक्ष भाजपने निवडला आहे.
दक्षिण जिल्हाध्यक्ष पदावर कोणाची वर्णी?
पुणे जिल्ह्यात एकूण तीन विभागांमध्ये विभागला जात असून पुणे शहर, उत्तर मावळ आणि दक्षिण पुणे असे भाग पडतात. आता उत्तर मावळमध्ये खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर-हवेली या तालुक्यांचा समावेश होतो, तर दक्षिणमध्ये भोर, पुरंदर, बारामती, इंदापूर, दौंड या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यामुळे पुणे दक्षिण जिल्हाध्यक्ष पदावर कोणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
काही तांत्रिक कारणांमुळे….
पेरणे वाडेबोल्हाई जिल्हा परिषद गटातून निवडणुकीत विजय
२०१२-१४ : जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम
२०१४-१७ : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले
२०१९ : भाजपमध्ये पक्ष प्रवेश
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक





