Dharmendra : मेरा बड़ा बेटा..! धर्मेंद्रंच्या शेवटच्या चित्रपटातील व्हॉईस नोट ऐकली का? ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा

Dharmendra Death : हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘ही-मॅन’ आणि दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले आहे. ८९ वर्षांच्या या व्यक्तीने मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते आणि रुग्णालयातही दाखल होते त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. तेव्हापासून ते त्यांच्या कुटुंबासोबत त्यांच्या घरी वेळ घालवत होते. मात्र, सोमवारी (दि. २४ ) सकाळी त्यांचे निधन झाले.
दरम्यान, आज सोमवारीच, ‘इक्कीस’मधील धर्मेंद्र यांच्या व्यक्तिरेखेचं नवं मोशन पोस्टर रिलीज झालं. या पोस्टमध्ये धर्मेंद्र यांची एक व्हॉईस नोट देखील आहे. त्यांचा आवाज ऐकून चाहते भावूक झालेत. एकीकडे चित्रपटाच्या पोस्टरची जोरदार चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे त्यांच्या निधनाच्या वृत्तानं चाहत्यांना धक्का बसला आहे.
View this post on Instagram
मोशन पोस्टरमध्ये धर्मेंद्र यांचा आवाज ऐकू येतोय. यामध्ये धर्मेंद्र म्हणत आहेत की, “मेरा बड़ा बेटा अरुण, ये हमेशा इक्कीस का ही रहेगा…” या फिल्ममध्ये धर्मेंद्र सेकेंड लेफ्टिनंट अरुण खेत्रपाल (अगस्त्य नंदा)च्या वडिलांच्या भूमिकेत दिसलेत. मॅडॉक फिल्मच्या या नव्या पोस्टरच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “वडील मुलांचं संगोपन करतात. महापुरुष राष्ट्र घडवतात… धर्मेंद्रजी एका २१ वर्षीय अमर सैनिकाचे वडील म्हणून इमोशनल पावरहाऊस आहेत.”
View this post on Instagram
शेवटच्या सिनेमासाठी केलेली ही पोस्टही त्यांची अखेरची पोस्ट ठरली आहे. धर्मेंद्र यांचा ‘इक्कीस’ हा सिनेमा येत्या २५ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा १९७१च्या भारत-पाक युद्धात पराक्रम गाजवलेल्या तरुण सैनिक परमवीरचक्र अरुण खेत्रपाल यांच्यावर आधारित आहे. धर्मेद्र यांनी गेली अनेक वर्ष त्यांच्या अभिनयाने बॉलिवूडवर राज्य केलं आहे.





