Dharashiv News : धाराशिवमध्ये अग्नितांडव ! एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू
धाराशिव तालुक्यातील (Dharashiv News) येडशी येथे रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीच एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला.

Dharashiv News : धाराशिव तालुक्यातील (Dharashiv News) येडशी येथे रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीच एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. करंडे किराण स्टोअर्स ॲंड गिफट वेअर या दुकानाला लागलेली आग शेजारील घरात पसरल्याने ही हृदयद्रावक दुर्घटना घडली. या घटनेमुळे ऐन दिवाळीच्या सणत संपूर्ण येडशी गावावर शोककळा पसरली आहे.
उत्तम करंडे, चंद्रकला करंडे, गोविंद करंडे, ज्योती करंडे, गायत्री करंडे आणि सिद्धी करंडे अशी मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या वेळी कुटुंबातील सर्व सदस्य गाढ झोपेत असताना ही दुर्घटना घडली. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण घराला (Dharashiv News) कवेत घेतले.
घराखाली किराणा दुकान असल्याने दुकानात साठवून ठेवलेले साहित्य व इतर ज्वलनशील वस्तूंमुळे आग अत्यंत वेगाने संपूर्ण वास्तूत पसरली. आग लागल्याचे लक्षात येताच नागरिकांनी तातडीने अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांना पाचारण केले.
अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आग विझवण्याचे आणि आत अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले. मात्र, आगीची प्रचंड तीव्रता आणि बंद खोल्यांमध्ये साचलेला विषारी धूर यामुळे बचावकार्यात मोठे अडथळे निर्माण झाले.
धुराच्या लोटांमुळे आत अडकलेल्या सदस्यांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही, परिणामी (Dharashiv News) गुदमरून आणि आगीत भाजून सहा जणांचा जागीच दुर्दैवी अंत झाला. या बचावकार्यात एका व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.






