Rohit Pawar: रोहित पवारांच्या मराठवाडा दुष्काळ पाहणी दौऱ्याची धाराशिवमधून सुरुवात
Rohit Pawar: जिल्ह्यातील आठही तालुक्यांत दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण

Rohit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आजपासून मराठवाडा दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आहेत. धाराशिवमधून त्यांनी या दौऱ्याची सुरुवात केली असून, आज बीड आणि लातूर जिल्ह्यांतही ते पाहणी करणार आहेत. धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा, तेरखेडा, मस्सा खंडेश्वरी आणि हावरगाव या गावांना ते भेट देणार आहेत.
धाराशिवमध्ये दुष्काळाची महाभयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पाऊस नसल्याने सोयाबीनची पिके करपून गेली आहेत. पाणीपातळीत कमालीची घट झाली असून, जिल्ह्यात केवळ आठ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे सांगितले जात आहे. तसेच, पाणीपातळीत सात मीटरने घट झाली आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यांत दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.
बीडमध्ये २४ तारखेला मोठे आंदोलन
“दुसरी राज्ये परिस्थितीचा विचार करून काम करत आहेत आणि मदत करत आहेत; मात्र आपल्या राज्यात काहीच होत नाही. त्यामुळे पवार साहेबांनी लोकांमध्ये जाऊन माहिती घेण्यास सांगितले आहे. दुष्काळाच्या प्रश्नावर बीडमध्ये २४ तारखेला मोठे आंदोलन करणार,” असे रोहित पवार यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा :





