Dharashiv Accident : धाराशिव जिल्ह्यात भीषण रस्ते अपघाताची घटना घडली आहे. लातूर-तुळजापूर महामार्गावर पाटोदा पुलाजवळ तीन वाहनांची जोरदार धडक होऊन तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाटोदा येथील पुलावर तीन वाहनांची समोरासमोर धडक झाली. धडक इतकी तीव्र होती की वाहनांचे मोठे नुकसान झाले आणि त्यामधील तीन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातात जखमी झालेल्या दोन जणांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना वाहनातून बाहेर काढण्यात नागरिकांनी मदत केली. दरम्यान, पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून पंचनामा करण्यास सुरुवात केली असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.