Satara: ‘धन्वंतरी’चा वर्धापनदिन व धन्वंतरी पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात
Satara गत 37 वर्षे संस्थेवरील विश्वास व प्रेम दृढ केलेल्या सभासदांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक चेअरमन डॉ. रवींद्र भोसले म्हणाले, धन्वंतरी पतसंस्था ही मुख्यत: वैद्यकीय व व्यावसायिक यांच्याकरता स्थापन करण्यात आली होती.

Satara: सहकार क्षेत्रात अग्रणी असणार्या व सामाजिक बांधिलकी जोपासणार्या सहकारभूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्थेचा 37 वा वर्धापनदिन व धन्वंतरी पुरस्कार वितरण सोहळा पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या धन्वंतरी सभागृहामध्ये शुक्रवारी उत्साहात झाला.
यावेळी वर्धापनदिनाचे औचित्य साधून व सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून संचालक मंडळाने माउली ब्लड बँकेच्या सहकार्याने आयोजित केलेल्या शिबिरात सभासद, संचालक, सेवक आणि हितचिंतक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक प्रा. अनिल बोधे व वनसंवर्धन अधिकारी श्री. हाके या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते धन्वंतरी पूजनव दीपप्रज्वलन करण्यात आले. यंदाच्या सोहळ्यात 2022-23, 23-24, 24-25 व 2025-26 या वर्षांसाठी कला, क्रीडा, सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या सभासदांना देण्यात येणारा धन्वंतरी पुरस्कार अनुक्रमे डॉ.विलास शहा, डॉ. विजयकुमार सुखटणकर, डॉ. सुभाष हिरवे, डॉ. सुधाकर लावंड, डॉ. महादेव मोरे, डॉ. सुधाकर बेंद्रे, डॉ. दिलीप पटवर्धन, डॉ. श्रीरंग कुंभार,डॉ. सुधीर पवार, कै. डॉ. कन्हैयालाल लाहोटी, कै. श्री. अरुण गोडबोले, डॉ. सौ. प्रिया शिंदे यांना मानाचा धन्वंतरी पुरस्कार देऊन प्रमुख पाहुणे,संस्थापक चेअरमन डॉ. रवींद्र भोसले व व्हा. चेअरमन डॉ. कांत फडतरे यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. रोख रक्कम, मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरुप होते.
गत 37 वर्षे संस्थेवरील विश्वास व प्रेम दृढ केलेल्या सभासदांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक चेअरमन डॉ. रवींद्र भोसले म्हणाले, धन्वंतरी पतसंस्था ही मुख्यत: वैद्यकीय व व्यावसायिक यांच्याकरता स्थापन करण्यात आली होती. पतसंस्थेशी जुन्या पिढीतील लोक जोडले गेलेले आहेतच,परंतु नव्या पिढीचा उत्तम प्रतिसाद मिळण्याच्या दृष्टीने संस्थेने डिजिटल बँकिंग सुरु केले असून स्वत:चे डाटा सेंटर कार्यान्वित केलेले आहे. त्यामुळे मोबाइल बँकिंग, आरटीजीएस, एनईएफटी, इ. अत्याधुनिक सुविधा संस्था विनासायास ग्राहकांना देत आहे. आजमितीस पतसंस्थेला आदर्श पतसंस्था म्हणून विविध सन्मान, पुरस्कार मिळून पतसंस्था यशाच्या शिखरावर विराजमान आहे. हे सर्व सभासदांमुळे शक्य झाले आहे व यापुढेही संचालक मंडळ सभासदाभिमुख कार्य करेल.
आज धन्वंतरी पतसंस्था यशाच्या शिखरावर आहे त्याचे श्रेय संस्थेचे चेअरमन डॉ. रवींद्र भोसले यांनी सभासदांना दिले. परंतु आज वैद्यकीय व्यावसायिक जे आपापल्या क्षेत्रात उत्तम कार्य करत आहेत त्यामागे धन्वंतरी पतसंस्था आहे. सुरुवातीस लहान जागेत सुरु झालेली पतसंस्था ही आज महाराष्ट्रात आदर्श पतसंस्था असल्याचे कौतुक असून आम्ही सदर पतसंस्थेचा सभासद असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो अशा प्रतिक्रिया ज्येष्ठ सभासद डॉ. सुधाकर बेंद्रे, डॉ. मोहन सुखटणकर, डॉ. सुधाकर लावंड यांनी व्यक्त केल्या.
संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय पवार यांनी संस्थेच्या विविध ठेव, कर्ज व इतर योजनांची माहिती दिली. व्हा. चेअरमन डॉ. कांत फडतरे म्हणाले, 16 ऑक्टोबर 1989 मध्ये लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष झाला असून त्यामध्ये आश्रयाला येणार्या सर्वांना छाया देण्याचे काम पतसंस्था करीत आहे. संस्थेच्या कामकाजात महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी त्यांनी महिलांसाठी केेलेल्या विविध ठेवव कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
संचालक डॉ. सुनील कोडगुले यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले. याप्रसंगी संचालक डॉ. अरविंद काळे, डॉ. शिरीेष भोईटे, डॉ. शकील अत्तार, डॉ. हेमंत शिंदे, डॉ. राजेंद्र जाधव, डॉ. अभिजित भोसले, डॉ. जयदीप चव्हाण, डॉ. सौ. सारिका मस्कर, डॉ. सौ. हर्षला बाबर, डॉ. नारायण तांबे, अॅड, सूर्यकांत देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीहरि डिंगणे, साहाय्यक उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौ. अलका मुरुमकर, सभासद,व सेवक वर्ग तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, ठेवीदार, हितचिंतक उपस्थित होते.





