मारहाण झालेल्या शिवराज दिवटेची धनंजय मुंडेंनी घेतली भेट; म्हणाले “या घटनेत जाती-धर्माचा संबंध नाही”

Dhananjay Munde | बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी परळी तालुक्यातील लिंबोटा गावात एका तरूणाला मारहाण करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. समाधान मुंडेसह त्याच्यासोबतच्या १०-१२ टोळक्याने शिवराज दिवटेचे अपहरण करून त्याला डोंगराळ भागात नेऊन बांबू व लाकडी दांडक्यांनी मारहाण केली.
या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी रुग्णालयात शिवराज दिवटेची भेट घेतली.
दिवटेच्या प्रकृतीची विचारपूस केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या घटनेचा तीव्र निषेध केला. या घटनेसंदर्भात मुंडे म्हणाले, ‘गुन्हेगाराला जात नसते, या घटनेला जातीचा रंग देण्याचा प्रयत्न काही जण प्रयत्न करीत आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केलं आहे की हा वाद जातीय किंवा धार्मिक कारणामुळे नाही. तपासातून खरी कारणं लवकरच समोर येतील’, असं मुंडे म्हणाले. Dhananjay Munde |
दोन दिवसांपूर्वी परळी तालुक्यात एका टोळक्याने मारहाण केलेल्या शिवराज दिवटे याची आज स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय अंबाजोगाई येथे भेट घेऊन त्याच्या तब्येतीची विचारपूस केली. लिंबोटा गावचे शिवराज, संदीपान दिवटे हे सर्वच माझ्या कुटुंबाचे सदस्य आहेत, अनेक वर्षांपासूनचे सहकारी… pic.twitter.com/pyGtEcO1bp
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) May 18, 2025
याशिवाय त्यांनी ट्वीट करत लिहिले की, “दोन दिवसांपूर्वी परळी तालुक्यात एका टोळक्याने मारहाण केलेल्या शिवराज दिवटे याची आज स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय अंबाजोगाई येथे भेट घेऊन त्याच्या तब्येतीची विचारपूस केली. लिंबोटा गावचे शिवराज, संदीपान दिवटे हे सर्वच माझ्या कुटुंबाचे सदस्य आहेत, अनेक वर्षांपासूनचे सहकारी आहेत. Dhananjay Munde |
शिवराजला मारहाण केलेल्या सर्व आरोपींवर कसलीही गय न करता कठोर कारवाई केली जावी. बीड पोलीस अधीक्षक श्री. नवनीत यांच्या नेतृत्वात पोलीस योग्य तपास करतील व आरोपींना कडक शासन केले जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. या घटनेत कुठेही जाती धर्माचा संबंध नाही, या पोलीस अधीक्षक यांच्या भूमिकेशी मी सहमत आहे. शिवराजला न्याय मिळणे व अशा घटनांची पुनरावृत्ती टाळणे यासाठी आगामी काळात कठोर पावले उचलली जावीत, याबाबत उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांच्याशी चर्चा करणार आहे,” असे धनंजय मुंडे यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणात 7 आरोपींना अटक करण्यात आली असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे. Dhananjay Munde |
हेही वाचा:
तयारीला लागा…! सप्टेंबर-ऑक्टोबरमध्येच निवडणुका होणार; अजित पवारांचं मोठं विधान





