देवोलिना भट्टाचार्जीने दिली, ‘गुड न्युज’

Devoleena Bhattacharjee । बिग बॉसच्या घरात दिसलेली देवोलिना भट्टाचार्जीने तिच्या चाहत्यांना खूशखबर दिली आहे. देवोलीनाने तिच्या चाहत्यांना ती गर्भवती असल्याची माहिती दिली. ही माहिती तिने आपल्या चाहत्यांना एका खास पद्धतीने दिली.
देवोलिना भट्टाचार्जी प्रेग्नंट असल्याच्या बातम्या काही काळ मीडियामध्ये आल्या होत्या, मात्र अभिनेत्रीने या वृत्तांचे वारंवार खंडन केले. आता अभिनेत्रीने स्वत: तिच्या इन्स्टाग्रामद्वारे घोषणा केली आहे की ती लवकरच आई होणार आहे.
View this post on Instagram
देवोलीनाने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. देवोलीनाच्या घरी पूजा आयोजित केल्याचे या फोटोवरून स्पष्ट होते. यातील पहिल्या फोटोमध्ये देवोलिना तिच्या पतीसोबत बसलेली आहे. तिच्या हातात लहान मुलाचे कपडे आहेत ज्यावर लिहिले आहे. आता विचारणे बंद करा. फोटोत एक कुत्राही दिसत आहे. या शेअर केलेल्या काही फोटोंमध्ये कुटुंबातील सदस्यही दिसत आहे.
दरम्यान, देवोलीना आणि शाहनवाज शेख यांचे २०२२ मध्ये लग्न झाले. डिसेंबर 2022 मध्ये देवोलिना भट्टाचार्जीने तिचा जिम ट्रेनर शाहनवाज शेखसोबत लग्न केले होते. देवोलिना याआधीही प्रेग्नंट असल्याच्या बातम्या अनेकदा आल्या होत्या. तेव्हा देवोलीनाने त्या बातम्या खोट्या असल्याचे म्हटले होते. जून 2024 मध्ये देवोलिना भट्टाचार्जीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करून ती प्रेग्नंट नसल्याचे स्पष्ट केले होते.





