देवोलीना भट्टाचार्जीने खरेदी केलं नवं घर; पतीच्या कृतीने जिंकली चाहत्यांची मनं

Devoleena Bhattacharjee | टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने मुंबईत नवं घर खरेदी केले आहे. तिने हिंदू रितीरिवाजांनुसार पती शाहनवाज शेखसोबत सर्व विधी पूर्ण केले. ज्याचे फोटो तिने सोशल मिडियावर शेअर केले आहेत.
या सोहळ्याला शाहनवाजने आरती देखील केली आणि देवाची मूर्ती हातात धरुन त्याची स्थापना देखील केली. त्याची ही कृती पाहून अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे.
इंस्टाग्रामवर फोटो शेअर करता देवोलीना भट्टाचार्यजीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “काही स्वप्ने सत्यात उतरण्यासाठी वेळ, धैर्य आणि खूप विश्वास लागतो. आज माझ्या स्वप्नातील घरात उभी राहून मला या सर्व प्रकारच्या भावना जाणवतात. प्रवास, धडे आणि आम्हाला इथपर्यंत घेऊन आलेल्या आशीर्वादांबद्दल मी आभारी आहे.” शहवाज ज्याप्रकारे हिंदू धर्माचा आदर करतो, ते पाहून देवोलिनाचे चाहतेही भारावून गेले आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, देवोलिना भट्टाचार्जी साथ निभाना साथिया मालिकेतील ‘गोपी बहू’ म्हणून घराघरात ओळख मिळाली. १४ डिसेंबर २०२२ रोजी तिने जिम ट्रेनर शहनवाज शेख यांच्याशी कोर्ट मॅरेज केले आणि दोन वर्षांनंतर १८ डिसेंबर २०२४ रोजी ती पहिल्या मुलाची आई झाली.
मात्र देवोलिनाने जेव्हा शहनवाजशी लग्न केले तेव्हा तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलेले कारण तो मुस्लिम धर्माचा आहे. परंतु तो हिंदू धर्माचा आदर करत असल्याचे पाहून चाहत्यांकडून त्याचे कौतुक केले जात आहे. Devoleena Bhattacharjee |
हेही वाचा:
Shirur News : टाकळी हाजी औटपोस्टमध्ये पोलीस अधिकारी दाखवा अन् बक्षीस मिळवा!





