Devendra Fadnavis : विनोद तावडेंच्या प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असतानाच भाजपचे नेते विनोद तावडे यांच्यावर झालेल्या आरोपांनी खळबळ माजली. विनोद तावडे थांबलेल्या हॉटेलमध्येच बहुजन विकास आघाडीचे नेते क्षीतिज ठाकूर आणि त्यांच्य कार्यकर्त्यांनी धाड टाकली. या हॉटेलमध्ये विनोद तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप ठाकूर यांनी केला. या सगळ्या प्रकरणावर आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
“विनोद तावडे हे कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यांच्याकडे कुठलाही पैसा सापडला नाही. त्यांच्याकडे कोणत्याही वादग्रस्त गोष्टी सापडल्या नाही. उलट त्यांच्यावरच हल्ला झाला. आमचे नालासोपाऱ्याचे उमेदवार आहे राजन नाईक यांच्यावरच हल्ला झाला आहे.
एकूणच ही जी काही इको सिस्टिम आहे. त्या सिस्टिमने उद्याचा पराभव दिसत आहे, तो कव्हर करण्यासाठी फायरिंग केलं आहे. विनोद तावडे यांनी कोणतेही पैसे वाटप केले नाही. त्यांच्याकडे कोणतेही पैसे नव्हते. सगळं नियोजन करून हल्ला करण्यात आला आहे” अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.





