पुणे जिल्हा | पेठगावात कोट्यवधींची विकासयकामे मार्गी

सोरतापवाडी, (वार्ताहर) – पेठगावच्या सरपंच पल्लवी चौधरी यांनी कमी कालावधीत कोट्यवधी रुपयांची विकासकामे आणली असून काही पूर्ण झाली आहे तरी काही पूर्णत्वास येत आहे.
4 जुलै 2024 रोजी सरपंच पदाचा कार्यभार स्वीकारताना गावासाठी विविध विकासकामे करण्याची खूणगाठ मनामध्ये बांधली.
त्याचबरोबर इतर गावांपेक्षा आपले पेठगाव कामाच्या बाबतीत कसे सुधारित राहील याची दक्षता घेऊन विकास कामे करताना गावात सर्वत्र समतोल राखला जाईल याची काळजी घेतल्याची सरपंच पल्लवी चौधरी यांनी सांगितले.
या विकास कामांमध्ये पेठ अंतर्गत धनंजय चौधरी घर ते महेश गायकवाड घरापर्यंत रस्ता करणे, पेठ चारवाडा वस्ती ते कोरेगाव मूळ शिव ओढा गटरलाइन करणे, पेठगाव विष्णू चौधरी विहीर ते अल्ट्राटेक कंपनी गेटकडे जाणारा रस्ता करणे, पेठ स्मशानभूमी परिसरात शौचालय बांधकाम करणे, पेठ येथील जि. प, प्राथमिक शाळा परिसरात शौचालय बांधकाम करणे,
पेठ स्मशानभूमी परिसरास स्नानगृह बांधकाम करणे, वडाची वाडी पेठ येथील ओपन जीमसाठी मुरमीकरण करून सपाटीकरण करणे, वडाची वाडी येथील सभागृह मंडप वाढीव काम करणे, वडाची वाडी येथे कॅमेरे बसविणे,
पेठ जिल्हा परिषद शाळा व काळुबाई मंदिर येथील गटारलाईन करणे, पेठ गुळुंजकर आळी रोड येथे सुरक्षा कॅमेरे बसविणे. स्मशानभूमी येथे पाण्याची सोय करणे. वडाची वाडी येथे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम सुरू आहेत.
ग्रामपंचायत येथे सुरक्षा कॅमेरे साठी 50 इंच टी. व्ही बसविणे, इस्माईल सय्यद घरापर्यंत पाणी पुरवठा करणे, श्री गणेश मंदिर चौक, गुळूंचकर चौक, दत्ताभाऊ चौधरी चौक, ग्रामपंचायत पेठ चौक, चारवाडा चौक, वडाची वाडी पेठ चौक, या मुख्य चौकात सौरऊर्जा वरील हायमास्ट लाईट बसवण्यात आले आहेत.
ग्रामपंचायत पेठ सरकारी दवाखान्याचे काम काम याच काळात चालू आहे. त्यासाठी कंपाऊंड करून मुख्य गेट बसवणे, दवाखाना दोन एकर जागा उकीरडे काढून साफसफाई करून सपाटीकरणाचे काम चालू आहे. गणेश मंदिर पेठ येथे गेट बसवणे काम पूर्ण झाले आहे.
गटार लाईन गायकवाड आळी ते मुख्य लाईन, दत्तात्रय जाधव ते मुख्य लाईन, अनिल चौधरी घर ते गांधी प्रोडक्टपर्यंत, रामदास चौधरी ते आढाव, जगतापपर्यंत, अबनावे ते ओढा पर्यंत गटार लाइनचे काम पूर्णत्वास आहे.
गावामध्ये वाड्यावर बेंच टाकणे, गावात पावसाळ्यात मुरुमीकरण करणे, दशक्रिया घाट व शाळेमध्ये वॉश बेसिंग बसवणे, जुने नामफलक दुरूस्ती करून बसवणे, नाले साफसफाई, शाळेतील मुख्य सभामंडपात लाईट सुविधा करणे, शाळेसाठी पाण्याची सोय करणे कामे पूर्ण झाली आहेत.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गावामधे मोफत नोंदणी करून, आधारकार्ड दुरूस्ती कॅम्प, तसेच शेतकरी कष्टकरी वर्गासाठी एक पाऊल जैविक शेतीसाठी हा उपक्रम घेऊन केरेन कंपनी यांच्या सौजन्याने मार्गदर्शन करण्यात आले.
स्मशान भूमी येथील साकव पुल, शिवदर्शन रोड येथील साकव पुल, पेठ ते नायगाव येथील साकव शिव रस्ता काँक्रिटीकरण मंजूर असून भूमिपूजन करून लवकरच कामाला सुरुवात होत आहे. तसेच शाळेसाठी चार खोल्या बांधकाम करणे काम मंजूरी अंतिम टप्प्यात आहे
संपूर्ण जिल्हा परिषदेच्या शाळेतील वापरण्यात येणार्या विजेसाठी व ग्रामपंचायत मधील पाणी पुरवठा विहिरींसाठी लागणारी वीज ही आता सौरऊर्ज वर चालणार आहे.
कमी कालावधीत रेकॉर्ड ब्रेक कामे करून सरपंच पल्लवी सुजित चौधरी यांना ग्रामविकास मंत्रालयाने सन्मान प्रमाणपत्र देऊन ग्रामपंचायत पेठ व सरपंच यांचे अभिनंदन केले आहे.
आदर्श सरपंच सूरज चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामांची घौडदोड चालू असल्याचे सरपंच पल्लवी चौधरी यांनी सांगितले.





