Pmc Election : विकासासोबत सामाजिक सलोखाही जपला : अर्चना पाटील

पुणे : प्रभाग क्रमांक २२ ‘क’ (काशेवाडी, डायस प्लॉट) येथील अधिकृत उमेदवार अर्चना तुषार पाटील यांनी विकासकामांसोबतच सामाजिक सलोखा जपण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सर्वधर्मीय सण- उत्सवांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेत प्रभागात एकतेचे आणि सलोख्याचे वातावरण निर्माण केले. प्रचारादरम्यान नागरिकांशी संवाद साधताना पाटील यांनी प्रभागात राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांची माहिती दिली.
पाटील म्हणाल्या, की प्रभागात दरवर्षी अशोक तरुण मंडळ आणि संयुक्त अण्णा भाऊ साठे मंडळाच्या वतीने गणेशोत्सवाचे आयोजन केले जाते. प्रभागातील नवरात्रोत्सवात दरवर्षी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. महिला वर्गाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असून, या माध्यमातून स्त्रीशक्तीचा जागर केला जातो. या नवरात्रोत्सवाला प्रभागाबाहेरील नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.
वीर गोगादेव जन्मोत्सवासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळवून देण्याचे काम पाटील यांनी केले असून, त्या स्वतःही आनंदाने या महोत्सवात सहभागी होतात, तसेच जैन समाजाच्या धार्मिक भावनांचा आदर राखत ‘आनुज्ञा ओवारना’ कार्यक्रमासाठी अरुण कुमार वैद्य स्टेडियमची जागा उपलब्ध करून देण्यात आली. या सहकार्यामुळे जैन समाजातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सामाजिक एकोपा जपण्यासाठी रमजान महिन्यात प्रभागातील मुस्लिम बांधवांसाठी दरवर्षी इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते. या उपक्रमातून सर्वधर्मीय एकतेचा संदेश दिला जात असल्याचे नागरिकांनी सांगितले.





