Shubhangi Sadavarte : देवबाभळीफेम अभिनेत्रीचा घटस्फोट; पाच वर्षांच्या संसाराला लागला फुलस्टॅाप! पोस्टद्वारे पतीने दिली माहिती म्हणाला…

Actress Shubhangi Sadavarte divorces : नुकतेच प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी आपल्या पत्नीसोबत सुखी संसाराच्या १७ वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याची पोस्ट त्यांच्या इंन्स्टाग्रामवरून शेअर केली होती. यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. अशातच आता रंगभूमीवर ज्या नाटकाने इतिहास रचला. प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्या नाटकातील अभिनेत्रीने घटस्फोट घेतल्याची बातमी समोर आली आहे.
रंगभूमीवर गाजलेले लोकप्रिय नाटक संगीत देवबाभळी नाटकातील प्रसिद्ध अभिनेत्री शुंभागी सदार्वेचाही घटस्फोट झाला आहे. याबाबत तिच्या पतीने सोशल मीडियावरून माहिती दिली आहे. अभिनेत्री शुभांगी सदावर्ते हिने २०२० मध्ये संगीतकार आनंद ओक यांच्यासोबत लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाली होती. पण त्यांच्या या निर्णयामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. आम्ही काही वर्षांपूर्वीच वेगळे झालो होतो, पण आता हा निर्णय जाहीर करण्यासाठी योग्य वेळ आहे, असं आनंद ओक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
View this post on Instagram
आनंद ओक यांची पोस्ट
आम्ही एकत्र घालवलेल्या प्रत्येक क्षणाबद्दल मी कृतज्ञ आहे. तसंच मी शुभांगीला तिच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. शुभांगी एक उत्कृष्ट अभिनेत्री आणि चांगली व्यक्ती आहे. भविष्यात जेव्हा संधी मिळेल, तेव्हा आम्ही दोघेही पूर्वीसारखेच एकत्र काम करू, असं पोस्टमध्ये आनंद ओक यांनी लिहिलं आहे. ११ जुलै रोजी शुभांगी सदावर्ते आणि आनंद ओक यांनी लग्न केलं होतं.
आनंद ओक यांनी संगीत देवबाभळी या नाटकाला संगीत दिलं आहे. तर अभिनेत्री शुभांगी सदावर्ते हिने याच नाटकात संत तुकारामांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. तिच्या भूमिकेचं प्रेक्षकांनी खूप कौतुक करत आहे. या नाटकाने तिला मोठी लोकप्रियता मिळवून दिली आहे. या नाटकाला कायमच हाऊसफुल्लचा बोर्ड लागलेला असतो.





