ज्यु. एनटीआर-जान्हवीचे ‘देवरा’मधील ‘धीरे धीरे’ रोमँटिक सॉंग वादात

Devara Song । दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआर आणि लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर पहिल्यांदाच देवर चित्रपटातून एकत्र दिसणार आहे. अशात नुकतेच याचित्रपटातील रोमँटिक सॉंग रिलीज झाले असून सोशल मीडियावर चर्चेत आले आहे.
‘धीरे धीरे’ गाण्यात जान्हवी आणि एनटीआरची रोमँटिक जोडी दिसत आहे. अनिरुद्ध रविचंदरने या गाण्याला संगीत दिले आहे, सोशल मीडियावर या गाण्यावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. हे गाणे ऐकल्यानंतर अनेक युजर्सने या गाण्याच्या म्युसिकवर प्रश्न उपस्थित केले आहे.
काही दिवसांपूर्वी श्रीलंकन गायक योहानीचे ‘मानिक मागे हिते’ हे गाणे चांगलेच चर्चेत आले. योहानी इंटरनेट सेन्सेशन बनली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर योहानीचे क्लिक शेअर करताना, एका वापरकर्त्याने अनिरुद्धला टॅग केले आणि लिहिले की रिपीट मोड चालू आहे. आता या गाण्याचे संगीत कॉपी केल्याचा आरोप युजर्स करत आहे. एका वापरकर्त्याने कमेंट केली, ‘गाणे आणि बीट ‘माणिक मागे हिट’ या गाण्यासारखेच आहेत.’ तर काहींनी या गाण्याचे कौतुक केले आहे.
दरम्यान, ‘देवरा’चे हे दुसरे गाणे आहे, याआधी ‘भय साँग’ नावाचे गाणेही रिलीज झाले होते. त्या गाण्यातही ‘देवरा’ची थीम दिसत होती. दरम्यान या चित्रपटात एनटीआर-जान्हवीसोबत सैफ अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तो नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. देवरा २७ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.





