Actress Divorce : “मला घटस्फोटाचा अजिबात पश्चाताप नाही”; घटस्फोटानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीचे स्टेटमेंट चर्चेत
Actress Divorce : साऊथ आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतील घटस्फोटावर मोठं स्टेटमेंट दिले आहे.

Actress Divorce : हिंदी आणि साऊथ चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री हंसिका मोटवानी सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मार्च 2026 मध्ये तिच्या घटस्फोटाची बातमी समोर आली होती.
डिसेंबर 2022 मध्ये तिने सोहेल कथुरिया याच्यासोबत लग्न केले होते, मात्र काही वर्षांतच या नात्याचा शेवट झाला. घटस्फोटानंतर अवघ्या महिन्याभरातच हंसिकाने एका मुलाखतीत मन मोकळं केले. ती म्हणाली, “मला घटस्फोटाचा अजिबात पश्चाताप नाही. चुकीच्या ट्रेनमध्ये बसलात तर पुढच्या स्टेशनवर उतरणं हेच योग्य ठरतं.” तिच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावरही मोठी चर्चा रंगली आहे. Actress Divorce
या कठीण काळातून सावरण्यासाठी हंसिकाने अध्यात्माचा मार्ग निवडला. याबाबत खुलासा करत ती म्हणाली, गेल्या दोन वर्षांपासून ती ईश्वरभक्तीत रमली असून हनुमान यांच्यावरील तिची श्रद्धा अधिक दृढ झाली आहे. दर मंगळवार आणि शनिवार ती हनुमान चालिसाचे पठण करते. “अस्वस्थता आणि तणाव वाढला की हनुमान चालिसा मला मानसिक बळ देते,” असे तिने सांगितले. (Actress Divorce)

Actress Divorce : “मला घटस्फोटाचा अजिबात पश्चाताप नाही”; घटस्फोटानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीचे स्टेटमेंट चर्चेत
यासोबतच तिने मानसिक आरोग्याबाबतही आपले मत मांडले. सुरुवातीला या समस्यांची जाणीव नव्हती, पण चिंता आणि तणाव वाढल्यानंतर मैत्रिणीच्या सल्ल्याने तिने थेरपीचा आधार घेतला. यामुळे तिच्या विचारांवर नियंत्रण मिळवणे आणि स्वतःला सावरणे सोप झाले.
प्रेमाबाबत विचारले असता हंसिका म्हणाली, “प्रेमावर माझा अजूनही विश्वास आहे. पण आता कोणतीही घाई नाही. योग्य वेळ आल्यावर योग्य व्यक्ती आयुष्यात येईल. सध्या मी स्वतःच्या आनंदावर आणि करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे.”
दरम्यान, लहान वयातच करिअरची सुरुवात केलेल्या हंसिकाला शाका लाका बूम बूम आणि क्योंकि सास भी कभी बहू थी या मालिकांमुळे लोकप्रियता मिळाली. मात्र, तिच्या लग्नानंतर वैयक्तिक आयुष्यामुळे ती ट्रोलिंगचाही सामना करत होती.
हेही वाचा : Ek Din Release Date: ‘एक दिन’चा दुसरा ट्रेलर रिलीज; पहा एकतर्फी प्रेमाची हळवी कहाणी!





