जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत देसाई कॉलेज प्रथम
Updated On:

पुणे – जिल्हास्तरीय 19 वर्षांखालील कबड्डी स्पर्धेत एच. व्ही. देसाई कॉलेजने प्रथम क्रमांक पटकावला. ही स्पर्धा नेहरू स्टेडियमजवळील महाराणा प्रताप मैदानावर घेण्यात आली. स्पर्धेत देसाई कॉलेजने कलावंती बदे कॉलेजचा पराभव केला. तिसरा क्रमांक एम. एम. सी. सी कॉलेजने मिळवला.
एकवेळ हा सामना बरोबरीत आल्यावर दोन्ही संघांना प्रत्येकी 5 रेड देण्यात आले त्यात देसाई कॉलेजने बाजी मारली. देसाई कॉलेजच्या अक्षय सभावतने अफलातून कामगिरी करत विजयात मोलाचा वाटा उचलला. यावेळी एच. व्ही. देसाई कॉलेजचे प्रशिक्षक ऋषी दुबे, प्राचार्य डॉ. राजेंद्र गुरव, सचिव हेमंत भाई मणियार, संयुक्त सचिव विनोद डेडिया व आमदार सुनील कांबळे आदी उपस्थित होते.





