पुणे जिल्हा | उपशिक्षण अधिकारी वर्ग 2पदी पल्लवी वाडेकर-पन्हाड
Updated On:

राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – येथील पल्लवी वाडेकर-पन्हाड हिची राज्यसेवा परीक्षेतून उपशिक्षण अधिकारी वर्ग 2 वर निवड झाली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत राज्य सेवा मुख्य परिक्षा 2022 चा निकाल नुकताच जाहिर झाला. या परीक्षेत वाडेकर-पन्हाड यांची निवड झाली आहे.
पल्लवी या मुंबई येथे उद्योग अधिकारी वर्ग 3 या पदावर कार्यरत आहेत. यापूर्वी त्याली वनपरिक्षेत्र अधिकारी वर्ग 2 या पदावर राज्यसेवा परीक्षेतून निवड होऊन त्या काम करीत होत्या. राज्य लोकसेवा आयोगाच्या त्यांनी तीन परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत.
त्यांची आई डॉ. मंगल वाडेकर या डॉक्टर असून वडील उपअभियंता बांधकाम म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत तर पती राहुल पर्हाड हे भूवैज्ञानिक या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या निवडीबद्दल खेड तालुक्यात त्यांचे कौतुक होत आहे.




