Pune News: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या हस्ते ‘कार्यसम्राट मोफत महा-आरोग्य शिबीरा’चे रविवारी उद्घाटन

पुणे : दिवंगत कार्यसम्राट आमदार विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमीत्त सोमेश्वर फाऊंडेशनतर्फे आयोजित कार्यसम्राट मोफत महा-आरोग्य शिबीराच्या तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन सर्वपक्षीय नेत्यांच्या हस्ते होणार आहे. सिंचननगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित रविवारी (दि. ४ ऑगस्ट) सकाळी ९ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती संयोजक माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी दिली.
सनी निम्हण म्हणाले, “महाआरोग्य शिबिराच्या तिसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कृषी मंत्री धनंजय मुंडे, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, उद्योग मंत्री उदय सामंत, शिवसेना उपनेते सचिन अहिर, खासदार सुप्रिया सुळे, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह पुण्यातील सर्व आमदार, माजी नगरसेवक आदी सर्वपक्षीय मान्यवर उपस्थित असणार आहेत.”
“महाआरोग्य शिबीर २२ जुलैपासून सुरू करण्यात आले. शिवाजीनगरपासून पाषाण, सोमेश्नरवाडीपर्यंत ३६ ठिकाणी आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहेत. यामध्ये पूर्व तपासणी, प्रथमिक उपचार, इसीजी, रक्त-लघवी तपासणी, सोनोग्राफी, एक्स रे, टूडी इको, तणाव तपासणी व मुख्य शिबीराची नोंदणी केली जात आहे. तपासणीपासून शस्त्रक्रियेपर्यत एकाच ठिकाणी सर्वकाही सोय असल्याने नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तिसऱ्या टप्प्यात रविवारी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत जगविख्यात डॉक्टरांचा सल्ला, तपासणी, औषधोपचार केले जाणार आहेत.
५ ऑगस्ट ते ५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत चौथ्या टप्प्यात शस्त्रक्रिया, उपचार यावर भर दिला आहे. डॉ. तात्यासाहेब लहाने, डॉ. वाकणकर, डॉ. गौतम भन्साळी, डॉ. रमाकांत देशपांडे, डॉ. के. एच संचेती, डॉ. विकास महात्मे, डॉ. यशराज पाटील, डॉ. अजय चंदनवाले, डॉ. संजयकुमार तांबे, डॉ. जगन्नाथ दिक्षीत, डॉ. अमित मायदेव, डॉ. अजय चौरसिया आदी तज्ज्ञ डॉक्टरांचा यामध्ये सहभाग आहे,” असे सनी निम्हण यांनी नमूद केले.
दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन माजी नगरसेवक दत्ता बहिरट, माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, आदित्य माळवे, श्वेता चव्हाण, राजश्री काळे, सामाजिक कार्यकर्त्या मंगला पाटील, सुनील शिरोळे, शैलेश बडदे, इक्बाल शेख, अनिल बहिरट, सतिश चव्हाण, अतुल बहिरट आदी मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतेच झाले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी शंकर चव्हण, अमित मुरकुटे, सचिन मानवतकर, सचिन इंगळे, अनिकेत कपोते, टिंकू दास, देवेंद्र देवकर, संतोष ओरसे, अभिषेक परदेशी, प्रमोद कांबळे, गणेश शेलार, गणेश शिंदे, ऋषीकेश मारणे, कृष्णा पटेल, बाळासाहेब सोरटे, कैलास पवार, कपिल शिंदे आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
महाआरोग्य शिबीराची वैशिष्टे:
– ॲलोपॅथी, आयुष (आयुर्वेद, होमिओपॅथी, योग, युनानी), दंतचिकीत्सा तपासणी
– मोफत उपचार, शस्त्रक्रिया व औषधी उपलब्ध
– देशातील नामवंत तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती
– विविध आजारांची तपासणी व उपचार
– एकूण ८० बाह्यरुग्ण कक्षांचा समावेश
– कृत्रिम अवयवांचे मोफत वितरण





