Bhor News : भोरमध्ये १७ जणांवर हद्दपारीची कारवाई; पोलिस उपअधीक्षकांकडून आदेश जारी

भोर : पोलिस ठाणे अंतर्गत भोर शहरासह इतर गावांमधील एकूण १७ जणांवर तालुका प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी मंगळवारी (दि. २) आणि शनिवारी (दि. ६) या दोन दिवसांसाठी १७ जणांना पोलिसांनी शहर आणि त्यांच्या गावातून हद्दपार केले आहे.
पोलिसांचे स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक आणि भोर पोलिस ठाण्यातील साध्या विषयातील पोलिस त्यांच्यावर देखरेख ठेवणार आहेत. या दोन दिवसांमध्ये जर संबंधित व्यक्ती मिळून आल्यास त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती भोर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांनी दिली.
गणेश विसर्जनाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे. भोरचे पोलीस उपअधीक्षक यांनी याबाबतचे आदेश जारी केले असून संबंधितांना पोलिसांमार्फत नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत.
हद्दपार केलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे :
विघ्नेश शंकर शेटे (रा. उत्रोली), मंगेश मारुती साबळे (मंगळवार पेठ भोर), तेजस संतोष (जेधेवाडी खानापूर), सागर दशरथ धोंडे (भोर), महादेव गणपती चिकणे ( टीटेघर), अमित प्रकाशसिंह तारू (भोर), गणेश ज्ञानोबा कंक (पांगारी), गणेश शंकर माने (चौपाटी भोर), निलेश किसन सुरगुडे (भोर), सिद्धांत संजय बोरकर (भोर), हनुमंत सोपान मळेकर (पिराचा मळा भोर), सनी सुरेश बारंगळे (सम्राट चौक भोर), समीर मोहम्मद मणेर (भोर ), दत्तात्रय शंकर शेटे (रा. उत्रोली), प्रकाश किसन नवघणे (आंबवडे), अविनाश राजेंद्र लोणकर (चौपाटी भोर), लक्ष्मण राजाराम दळवी (अंगसुळे).





