Pune District : वाल्हे परिसरात दाट धुके, शेतकरीवर्ग चिंताग्रस्त

वाल्हे : पुरंदर तालुक्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस होत असलेल्या वातावरणातील बदलाने वाल्हे परिसरात शनिवारह (दि. 21) पहाटेपासूनच दाट धुक्याची चादर पसरली होती. धुके इतके दाट होते कि समोरचे काही दिसत नव्हते.
मागील आठवड्यापासून थंडीची तीव्रता अधिक होती. दोन दिवसांपासून माञ थंडीचे प्रमाण कमी होत झाले आहे. शनिवारी पहाटेपासूनच, वाल्हे, पिसुर्टी, जेऊर, मांडकी या परिसरात दाट धुक्यांची चादर पसरली होती. अचानक थंडीची तीव्रता वाढून येथील नागरिकांनी महाबळेश्वरचा फील अनुभवला.
मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडलेल्या अनेक नागरिकांनी आज भरपूर फोटोसेशन करीत या धुक्याचे फोटो काढत सोशल मीडियावर टाकले जात होते. सकाळी व रात्री गारठा आणि दुपारी कडक ऊन असा विचित्र वातावरणाचा अनुभव सध्या वाल्हे व परिसरात आहेत. या विचित्र वातावरणाचा परिणाम शेतातील पिकांवर मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असल्याने, शेतकरीवर्ग चिंताग्रस्त होत आहेत.





