Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार? थेट अमिह शाहंना धाडलं पत्र, राज ठाकरेंचंही केलं भरभरून कौतुक
Tukaram Mundhe : अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून भेसळखोरांविरोधात कारवाईचा धडाका लावला आहे.

Tukaram Mundhe : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भेसळखोरांविरोधात कठोर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. त्यांच्या कामाचे विविध स्तरातून कौतुक होत असतानाच आता त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्याची मागणी करण्यात आली आहे. (Tukaram Mundhe)
‘आम्ही गिरगावकर संघटने’ने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवत तुकाराम मुंढे यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, या पत्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचेही कौतुक करण्यात आले आहे. (Tukaram Mundhe)
तुकाराम मुंढेंना मुख्यमंत्री करण्याची मागणी
आम्ही गिरगावकर संघटनेने अमित शाह यांना पाठवलेल्या पत्रात महाराष्ट्र आणि मराठी भाषिकांच्या विविध प्रश्नांचा उल्लेख केला आहे. मराठी भाषिकांवर अन्याय होत असल्याचा दावा करत या प्रश्नांवर कठोर निर्णय घेण्यासाठी तुकाराम मुंढे यांच्यासारख्या अधिकाऱ्याची गरज असल्याचे संघटनेने म्हटले आहे. महाराष्ट्र आणि मराठीच्या हिताचे निर्णय कोणत्याही दबावाला न जुमानता घेण्याची क्षमता तुकाराम मुंढे यांच्यात असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. (Tukaram Mundhe)
परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांच्या परवान्याचा मुद्दा
मुंबईतील मराठी भाषिकांच्या प्रश्नांवरही या पत्रातून आवाज उठवण्यात आला आहे. मराठी येत नसतानाही परप्रांतीय रिक्षा आणि टॅक्सी चालकांना परवाने दिले जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. तसेच मराठी भाषिकांच्या घरांवर कारवाई होत असल्याचा दावाही पत्रात करण्यात आला आहे. (Tukaram Mundhe)
मुंबईतील राखीव मैदाने, आरक्षित भूखंड आणि महत्त्वाच्या जागा धनाढ्यांच्या घशात घातल्या जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या सर्व बाबींवर कठोर निर्णय घेण्यासाठी तुकाराम मुंढे यांची आवश्यकता असल्याचे संघटनेने म्हटले आहे. (Tukaram Mundhe)
राज ठाकरेंचंही कौतुक
या पत्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचेही कौतुक करण्यात आले आहे. मुंबई आणि मराठी माणसाच्या प्रश्नांसाठी राज ठाकरे भक्कमपणे उभे असल्याचे संघटनेने म्हटले आहे. बाळासाहेब ठाकरे हयात नसल्याचा फायदा घेत मुंबई बळकावण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही पत्रातून करण्यात आला आहे. (Tukaram Mundhe)
मराठी भाषिकांवर होणारा अन्याय थांबवण्यासाठी नवीन कायदा करण्याची मागणीही या पत्रात करण्यात आली आहे. नव्या इमारतींमध्ये मराठी माणसांसाठी राखीव घरे ठेवण्यासह मुंबईतील आरक्षित मैदाने, भूखंड आणि महत्त्वाच्या जागांचे संरक्षण करण्याची गरज असल्याचे संघटनेने म्हटले आहे. दरम्यान, या पत्रामुळे तुकाराम मुंढे यांना मुख्यमंत्री करण्याच्या मागणीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. (Tukaram Mundhe)






