Abhijit Dipke : अभिजित दिपके यांच्या वडिलांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी; कोणी दिले थेट निवडणूक आयोगाला पत्र?
Abhijeet Dipke: 'जर १ कोटी रुपयांच्या देणगीची घोषणा झाली असेल, तर निवडणूक आयोगाने चौकशी केली पाहिजे'

Abhijit Dipke : कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके अमेरिकेत शिक्षणासाठी होते. त्यानंतर ते भारतात परतले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनाला मोठे यश मिळाले. अखेर धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर आता अभिजित दिपके यांच्या वडिलांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र सरकारचे निवृत्त कर्मचारी असलेल्या वडिलांनी आपल्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी निधी कसा उभा केला, यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सुरतचे रहिवासी आणि माहिती अधिकार कार्यकर्ते अमित तिवारी यांनी निवडणूक आयोग आणि केंद्रीय जीएसटीकडे ही मागणी केली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अमित तिवारी यांनी अभिजीत दीपकेचे वडील भगवानराव दीपके यांच्या आर्थिक परिस्थितीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. दीपके यांचे वडील महाराष्ट्र सरकारचे सेवानिवृत्त कर्मचारी असून त्यांनी अभिजीत यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवले होते.
कार्यकर्ते अमित तिवारी यांनी भारतीय निवडणूक आयोग आणि कर विभागाला पत्र लिहीत CJP च्या आंदोलकांवरील पोलीस खटल्यांसाठी ज्येष्ठ वकील आणि राज्यसभा खासदार कपिल सिबल यांनी जाहीर केलेल्या १ कोटी रुपयांच्या कायदेशीर बचाव निधीची तपासणी करण्याची मागणी केली आहे. तसेच सीजीपीच्या आर्थिक व्यवहारांसह संस्थापक दीपके यांच्या कौटुंबिक उत्पन्नाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कॉक्रोच जनता पार्टी ही एक नोंदणी नसलेली संघटना
तक्रारीत अमित तिवारी म्हणाले की, कॉक्रोच जनता पार्टी ही एक नोंदणी नसलेली संघटना आहे, पण ती एक राजकीय पक्ष म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे, जर १ कोटी रुपयांच्या देणगीची घोषणा झाली असेल, तर निवडणूक आयोगाने चौकशी केली पाहिजे. लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५१ च्या कलम २९अ अंतर्गत CJP ची नोंदणी झाली आहे की नाही, याची आयोगाने चौकशी करावी.
एक कोटी रुपयांची मदत जाहीर
काही दिवसापूर्वी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी नीट पेपरफुटी प्रकरणात दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या आंदोलकांना कायदेशीर मदत देण्यासाठी केंद्रीय लोकअभियोजन आणि तपास मंडळाला एक कोटी रुपयांची देणगी जाहीर केली आहे. यावर आता प्रश्न निर्माण करत तक्रार करण्यात आली आहे.
हेही वाचा:






