मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडून राजीनाम्याची मागणी; राष्ट्रगीताचा अवमान केल्याचा आरोप

Chief Minister Nitish Kumar | राष्ट्रगीताचा कथितपणे अवमान केल्याच्या आरोपावरून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. त्या मुद्द्यावरून विरोधकांनी बिहार विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत आक्रमक पवित्रा स्वीकारला. तसेच, नितीश यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
पाटण्यात गुरूवारी एका कार्यक्रमाला नितीश उपस्थित राहिले. त्यावेळी राष्ट्रगीत सुरू असताना ते हसत होते. तसेच, आजूबाजूला उभे असणाऱ्यांना अभिवादन करत होते. त्यावरून विरोधकांनी नितीश यांना घेरले. विधानसभेत विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी नितीश यांच्या वर्तणुकीवर तातडीने चर्चेची मागणी केली. मात्र, नंतर चर्चा घेण्याचे सूतोवाच सभापतींनी केल्याने विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यांनी नितीश यांनी बिनशर्त माफी मागण्याची मागणीही लावून धरली.
राष्ट्रगान का अपमान
केवल कुर्सी पर ही ध्यान
पूछ रहा पूरा हिंदुस्तान
कहां है नकली देशभक्तों का ज्ञान?#TejashwiYadav #RJD pic.twitter.com/ss2i9J9qh8— Tejashwi Yadav (@yadavtejashwi) March 21, 2025
त्यावरून गदारोळ झाल्याने काही काळ विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले होते. नंतर पत्रकारांशी बोलताना तेजस्वी यांनी नितीश यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. नितीश यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे दिवसागणिक स्पष्ट होत आहे. त्यांच्या हाती बिहार सुरक्षित नाही, असे तेजस्वी म्हणाले. तर, नितीश यांनी त्यांच्या पुत्राकडे सुत्रे सोपवावीत, अशी मागणी विधान परिषदेत विरोधी पक्षनेत्या राबडी देवी यांनी केली.
हेही वाचा:
अक्षय कुमारच्या ‘केसरी’ चित्रपटाचा सिक्वेल येणार? अभिनेत्याने पोस्ट शेअर करत दिली हिंट





