Kesari Part 2 Update | अभिनेता अक्षय कुमारचा ‘केसरी’ हा चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत मख्य भूमिकेत परिणीती चोप्रा पाहायला मिळाली. या जोडीने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. या चित्रपटाच्या कथेसह यातील गाण्यांना देखील प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
अक्षय कुमारचा ‘केसरी’ चित्रपट 21 मार्च 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्याला 6 वर्षे पूर्ण झाले आहे. या प्रसंगी, अभिनेत्याने एक विशेष पोस्ट शेअर केली आहे, त्यानंतर केसरी 2 ची चर्चा सुरू झाली आहे. ‘केसरी’च्या 6 वर्षानंतर चित्रपटाचा सीक्वल लवकरच भेटीला येणार असल्याची त्याने हिंट दिली आहे.
View this post on Instagram
अक्षय कुमारने पोस्टमध्ये ‘केसरी’चा एक खास व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं की, “केसरीच्या यशाची ६ वर्षे पूर्ण झाली आहेत. केसरी भावना आणि शौर्याची कहाणी आहे. लवकरच नवीन अध्यायाला सुरूवात करत आहोत.” अक्षय कुमारच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच ‘केसरी’चा सीक्वल येणार असल्याची चर्चा सर्वत्र पाहायला मिळत आहे. अक्षयच्या या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. Kesari Part 2 Update |
‘केसरी’ या चित्रपटात 21 शीख सैनिकांच्या शौर्याची कहाणी सांगण्यात आली होती. यात अक्षय कुमारने ईशर सिंह यांची भूमिका साकारली आहे. यातील अक्षय कुमारच्या भूमिकेचेही कौतुक झाले. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीतही चांगली कामगिरी केली होती. Kesari Part 2 Update |
हेही वाचा:
नागपूर हिंसाचार प्रकरणी एमडीपी अध्यक्ष आणि युट्यूबरला अटक; चौकशीतून धक्कादायक खुलासा