Farmers News : मराठवाड्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांचा टाहो
Farmers News : जालना जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिके पूर्णपणे वाळून गेली आहेत.

Farmers News : जालना जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात मागील महिनाभरापासून पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे बळीराजा पूर्णतः चिंतेत सापडला आहे. हजारो हेक्टरवरील खरिपात पेरलेले सोयाबीन, मका, तूर आणि इतर पिके सुकून गेली आहेत. (Farmers News)
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना धीर दिला. तसेच शेतकऱ्यांच्या वतीने सरकारला तात्काळ मराठवाड्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. (Farmers News)
कोरडा दुष्काळ जाहीर न केल्यास येत्या काही दिवसांत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जालना जिल्हाध्यक्ष मनीष श्रीवास्तव आणि महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष रूपम घुगे यांनी दिला आहे. (Farmers News)
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचताच पिकांची झालेली अवस्था आणि आर्थिक संकटाची व्यथा सांगताना काही शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले. (Farmers News)
Farmers News : धुळ्यात पावसाची दडी; 31 जुलैनंतर पाऊस गायब, शेतकऱ्यांची चिंता वाढली






