पुणे जिल्हा | काटे मोटर्सकडून 21 इलेक्ट्रिक गाड्यांचे वितरण

भवानीनगर, (वार्ताहर) – बारामती-इंदापूर आणि चौफुलाचे टाटा मोटर्सचे अधिकृत विक्रेते काटे मोटर्स प्रा. लि. यांनी टाटा मोटर्सने बाजारात आणलेल्या नवीन इलेक्ट्रिक 21 गाड्यांचा वितरण सोहळा आयोजित केला होता.
त्यासाठी टाटा मोटर्सकडून महाराष्ट्र छत्तीसगडचे प्रादेशिक व्यवस्थापक अभिषेक दुबे आणि विनय चेतलूर यांच्यासह बारामती, इंदापूर चौफुला येथून जवळजवळ 300 ग्राहक आणि मित्रपरिवार या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
दूध उत्पादक शेतकरी यांच्यासाठी नवसंजीवनी ठरलेल्या इलेक्ट्रिक गाड्या घेताना सर्व शेतकरी वर्गाच्या चेहर्यावरील आनंद द्विगुणित झालेला होता.
टाटा मोटर्सचे अभिषेक दुबे आणि विनय चेतलुर यांनी टाटा मोटर्स शेतकर्यांच्या आणि कष्टकर्यांच्या सेवेमध्ये असेच चांगल्या प्रतीचे मॉडेल्स उपलब्ध करून देतील आणि सर्वोत्कृष्ट सेवा देण्याचा प्रयत्न करण्यासाठी कटिबद्ध आहेत असे सांगितले.
याप्रसंगी काटे मोटर्सचे संचालक वैभव काटे यांनी उपस्थित ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगितले.
त्यासोबतच काटे मोटर्स एका नवीन रूपात इंदापूर रोड मोतीबाग येथे भव्य दिव्य नवीन शोरूम घेऊन येत असल्याचे विद्याधर काटे यांनी सांगितले. सर्व इलेक्ट्रिक गाड्यांचे वितरण झाल्यानंतर संपूर्ण बारामती शहरांमधून या गाड्यांची रॅली निघाली आणि त्यानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला.





