डिलिव्हरी बाॅयच्या नोकऱ्या धोक्यात; ड्रोनद्वारे वस्तू पुरवठा वाढला
Updated On:

नवी दिल्ली – राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्लीनजीक गुरुग्राममध्ये देशातील आणि परदेशातील बड्या कंपन्या कार्यरत आहेत. येथे लोक नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार लवकर करतात. अशा परिस्थितीत स्काये एअर या ड्रोन कंपनीने जारी केलेल्या माहितीनुसार केवळ डिसेंबर महिन्यामध्ये गुरुग्राममध्ये द्रोणद्वारा तब्बल 1.5 लाख डिलिव्हरी करण्यात आल्या.
ज्या वस्तूचा पुरवठा ड्रोनद्वारे करण्यात आला त्यामध्ये किराणा माल औषधे, आयफोन, त्वचा विषयक औषधीचा समावेश आहे, असे या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित कुमार यांनी सांगितले. या कामी ग्राहकाबरोबरच वस्तू पुरवठा करणार्या कंपन्या सहकार्य करीत आहेत. त्यामुळे एवढे मोठे ध्येय साध्य होण्यास मदत झाली असल्याचे ते म्हणाले.





