Gurugram News : गुरूग्राममध्ये मोठी दुर्घटना ! मातीचा ढिगारा कोसळून 7 मजुरांचा मृत्यू
गुरूग्राममध्ये (Gurugram News) बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी मातीचा ढिगारा कोसळून ७ मजूर मृत्युमुखी पडले. त्या दुर्घटनेत चौघे जखमी झाले. जखमींमध्ये नेपाळच्या ३ नागरिकांचा समावेश आहे.

Gurugram News : गुरूग्राममध्ये (Gurugram News) बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी मातीचा ढिगारा कोसळून ७ मजूर मृत्युमुखी पडले. त्या दुर्घटनेत चौघे जखमी झाले. जखमींमध्ये नेपाळच्या ३ नागरिकांचा समावेश आहे. बांधकामाच्या ठिकाणी सोमवारी रात्री मातीचा ढिगारा कोसळला.
त्या ढिगाऱ्याखाली (Gurugram News) सुमारे १२ ते १५ मजूर अडकले. त्याविषयीची माहिती समजताच पोलीस आणि आपत्ती प्रतिसाद दलांची पथके घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी तातडीने बचाव कार्य हाती घेतले. त्यामुळे काही मजुरांचा जीव वाचला.
जखमींना उपचारासाठी नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. मृतांपैकी ६ जण झारखंडचे रहिवासी होते. तर, उर्वरित मृत मजूर राजस्थानचा असल्याचे समजते. संबंधित दुर्घटनेच्या चौकशीसाठी जिल्हा प्रशासनाने समिती स्थापन केली.
दरम्यान, मृत मजुरांच्या कुटूंबीयांनी बांधकामाच्या ठिकाणी पुरेशा सुरक्षा उपाययोजना नसल्याचा आरोप केला. त्यांनी प्रत्येकी ५० लाख रूपयांच्या भरपाईचीही मागणी केली. प्रामुख्याने मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याने गुदमरून मजुरांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट होत आहे.





